advertisement

लग्नासाठी रूखवताचं सामान फक्त 20 रुपयांपासून, दादरमध्ये खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन!

Last Updated:

Wedding Rukhwat : लग्नात लोक आवर्जून रुखवत खरेदी करतात. तुमच्या घरी देखील लग्नसराईचा माहोल असेल तर तुमच्यासाठी दादरमध्ये एक बेस्ट ऑप्शन आहे.

+
इथे

इथे मिळतील रुखवताचे सगळे सामान

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्या लग्नाचा सीजन सुरू असल्यामुळे लग्नसराईत लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. प्रत्येक लग्न सराईमध्ये आकर्षित करणारी गोष्ट असते ती म्हणजे रुखवताचं सामान. लग्नात लोक आवर्जून रुखवत खरेदी करतात. तुमच्या घरी देखील लग्नसराईचा माहोल असेल तर तुमच्यासाठी दादरमध्ये एक बेस्ट ऑप्शन आहे. दादर स्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्री स्वामी समर्थ अगरबत्ती सेंटरमध्ये फक्त 20 रुपयांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या रुखवतात मांडता येतील आणि आकर्षित अशा वस्तू आहेत.
advertisement
या वस्तूंमध्ये तुम्हाला सुंदर घोडा गाडी सुद्धा मिळेल. घोडा गाडी अगदी छान सजवलेली आहे आणि पुठ्ठ्यापासून बनवलेली आहे. ही जर तुम्ही रुखवत ठेवली तर नक्कीच ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल. यासोबतच लग्नाची विधी करत असणाऱ्या काही बाहुल्या सुद्धा तुम्हाला दिसतील. छोट्या चिमणीचं घरट, सुंदर असं घर जे पाहिल्यावर कोणासही मन प्रसन्न होईल. सौभाग्याचे अलंकारांनी भरलेलं छोटा सूप, नवरीची डोली, सुंदर रंगाने डेकोरेट केलेले कलश मिळतील. यात तुम्हाला खूप व्हरायटीसुद्धा मिळतील.
advertisement
त्यासोबत सात सप्तपदी त्यांची वचन, सात पावलं, केळ्याच्या पानावर भरलेलं संपूर्ण ताट असे सगळे रुखवताचे सामान मिळेल. यांच्याकडे आणखी एक लक्ष वेधून घेणारी रुखवतात मांडली जाणारी गोष्ट आहे ती म्हणजे दगडाची छोटी भांडी. इथे तुम्हाला संसारात महत्त्वाची मानली जाणारी चूल, वरवंटा, खलबत्ता अशा सगळ्या छोट्या छोट्या वस्तू दगडाने बनवलेला मिळतील. यात वस्तूंनी नक्कीच रुखवत सुंदर दिसेल आणि उठावदार सुद्धा.
advertisement
तुम्हाला जर छोट्या हळदीकुंकवाच्या बॅग्स हव्या असतील तर त्या सुद्धा सौभाग्याचा अलंकार म्हणून तुम्ही रुखवता ठेवू शकता. या दुकानात फक्त तुम्हाला रुखवत सामान नाही तर त्याबरोबरच लग्नाच्या इतर विधींचा सामान सुद्धा मिळेल. ज्यामध्ये मुंडावळ्यांपासून ते लग्नाच्या टोपीपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. 20 रुपयांपासून वस्तूंची खरेदी करता येईल. 
advertisement
'आमच्या दुकानात रुखवताचे सगळे सामान मिळेल. तुम्हाला जर रुखवत असतं सेट हवा असेल तर तो तुम्हाला इथे फक्त 1500 रुपयांना मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला 20 रुखवताच्या वस्तू मिळतील. हा एक सेट घेतल्यामुळे तुम्हाला बाकी गोष्टी घेण्याचा त्रास होणार नाही. या 20 गोष्टींच्या सेटमध्ये तुम्हाला एक घर, गणपती बाप्पाची मूर्ती, कलश, सात पावलं, सूप, चिमणीचं घरट, सौभाग्यलंकार अशा सगळ्या वस्तू मिळतील' असे सिद्धेश उत्तेकर यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नासाठी रूखवताचं सामान फक्त 20 रुपयांपासून, दादरमध्ये खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement