दिवाळीसाठी ठाण्यात करा मनसोक्त कपड्यांची शॉपिंग,1200 रुपयांपासून सुंदर ड्रेस कॉम्बिनेशन

Last Updated:

दिवाळी शॉपिंग ही प्रत्येक महिलेसाठी आनंदाची गोष्ट असते. ठाण्यात सुद्धा दिवाळी शॉपिंगसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे.

+
या

या दिवाळीत शॉपिंग करा मनसोक्त.

साक्षी पाटील, प्रतिनिधी 
ठाणे : दिवाळी म्हंटल की फराळ सोबत येते ती दिवाळी शॉपिंग. दिवाळी शॉपिंग ही प्रत्येक महिलेसाठी आनंदाची गोष्ट असते. ठाण्यात सुद्धा दिवाळी शॉपिंगसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. ठाणे स्टेशनपासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या गर्ल 16 एनएक्स या दुकानात तुम्हाला सुंदर दिवाळीसाठीचे मोठमोठे ड्रेसेस तर बाराशे ते पंधराशे रुपयांना मिळतील.
advertisement
अनेक जणींना दिवाळी सारख्या सणाला भरलेले आणि इंडो वेस्टर्न ड्रेस घालायला खूप आवडतात. यामध्ये आपला लूक उठावदार तर होतोच, परंतु अशा सगळ्या कपड्यांमध्ये आपण स्वतःला कॉन्फिडंट सुद्धा फील करतो. म्हणूनच अनेक महिला या कपड्यांना प्राधान्य देतात.
ठाण्यातील गर्ल 16 एनएक्स या दुकानात तुम्हाला इंडो वेस्टर्नमध्ये कुर्ती आणि झब्बा, जॅकेट आणि पायजमा, कुर्ता आणि धोती हे प्रकार मिळतील तर या सोबतच हेवी लॉन्ग वन पीस सुद्धा वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये यु कट पॅटर्न, वि कट पॅटर्न सुद्धा उपलब्ध आहेत. यासोबतच अनेक जणींना कुर्ती, स्कर्ट आणि ओढणी हे कॉम्बिनेशन सुद्धा फार आवडतं. हे सुंदर कॉम्बिनेशन सुद्धा बाराशे रुपयांपासून इथे उपलब्ध आहे.
advertisement
'आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहोत. दिवाळी सारख्या सणाला गिऱ्हाईकांच्या मागणीनुसारच आम्ही दुकानात कपडे आणतो. यंदा महिलांचा कल इंडो वेस्टर्न कपड्यांना विकत घेण्याकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही तशाच प्रकारचे कपडे आणलेले आहेत. कपडा चांगला असल्यामुळे महिला आनंदाने आमच्या दुकानात नेहमी येतात', असे दुकानदार सुमित ठक्कर यांनी सांगितले.
advertisement
तर मैत्रिणींनो वाट कसली पाहताय तुम्हालाही यंदाची दिवाळी स्टायलिश लुक करून साजरी करायचे असेल. तुम्हाला यंदा ट्रेडिंग कपडे खरेदी करायचे असतील तर आवर्जून ठाण्यातील या गर्ल 16 एन एक्स दुकानाला भेट द्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दिवाळीसाठी ठाण्यात करा मनसोक्त कपड्यांची शॉपिंग,1200 रुपयांपासून सुंदर ड्रेस कॉम्बिनेशन
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement