Business Idea : दिवाळीसाठी हँडमेड तोरण आणि दिवे, किंमत 200 रुपये, व्यवसाय करण्यासाठी करा होलसेल खरेदी, Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दिवाळीच्या उत्साहात बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. खास करून घराच्या मुख्य दरवाजासाठी, खिडक्यांसाठी आणि पूजेसाठी आकर्षक सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
मुंबई: दिवाळीच्या उत्साहात बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. खास करून घराच्या मुख्य दरवाजासाठी, खिडक्यांसाठी आणि पूजेसाठी आकर्षक सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर झवेरी बाजार येथील पीयूष क्रिएशन या दुकानात प्रीमियम क्वालिटीचे हँडमेड तोरण आणि दिवे उपलब्ध आहेत.
या दुकानात मिळणारी तोरणे हाताने तयार केलेली असून, त्यामध्ये फुलांचे, कापडाचे, मण्यांचे आणि अँटीक कडदाना वर्कचे पर्याय उपलब्ध आहेत. या तोरणांची किंमत 200 पासून सुरू होते आणि डिझाईननुसार ती 1500 पर्यंत जाते. शुभ लाभ हँगिंग्सची देखील खास रेंज येथे मिळते. या जोडीची किंमत 180 ते 400 दरम्यान आहे. ही हँगिंग्स दरवाजाच्या सजावटीसाठी खास आकर्षण ठरते.
advertisement
दिव्यांच्या प्रकारात पारंपरिक दिवे, अँटीक वर्कचे आणि फॅन्सी डिझाईनचे दिवे उपलब्ध आहेत. या दिव्यांची किंमत 200 पासून सुरू होऊन 1000 पर्यंत आहे. रंगीबेरंगी प्रकाशात झळकणारे हे दिवे पूजेसाठी आणि सजावटीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
advertisement
पीयूष क्रिएशनमध्ये होलसेल आणि रिटेल दोन्ही दरात खरेदी करण्याची सोय आहे. दर्जेदार आणि कलात्मक वस्तू वाजवी दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली आहे असे दुकानाचे मालक सांगतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराला नवा लुक देण्यासाठी आणि पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी या वस्तू नक्कीच उपयोगी पडतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 09, 2025 3:17 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Business Idea : दिवाळीसाठी हँडमेड तोरण आणि दिवे, किंमत 200 रुपये, व्यवसाय करण्यासाठी करा होलसेल खरेदी, Video









