टी-शर्टपासून ते बॅच, ट्रेकिंगच्या भन्नाट वस्तू, खरेदी करा 50 रुपयांपासून, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
जर तुम्ही ट्रेकिंग प्रेमी आहात आणि तुम्हाला ट्रेकिंग निगडित वेगवेगळे साहित्य विकत घ्यायला आवडतं तर तुम्ही ट्रेकिंगसाठीच्या वेगवेगळ्या भन्नाट अशा वस्तू विकत घेऊ शकता. मुंबईतील ट्रेकर्स अड्डा या ग्रुपकडे ट्रेकिंग रिलेटेड वेगवेगळ्या वस्तू फक्त 50 रुपयांपासून मिळतात.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : अनेकांना फिरायला आणि ट्रेकिंग करायला खूप आवडतं. जर तुम्ही ट्रेकिंग प्रेमी आहात आणि तुम्हाला ट्रेकिंग निगडित वेगवेगळे साहित्य विकत घ्यायला आवडतं तर तुम्ही ट्रेकिंगसाठीच्या वेगवेगळ्या भन्नाट अशा वस्तू विकत घेऊ शकता. मुंबईतील ट्रेकर्स अड्डा या ग्रुपकडे ट्रेकिंग रिलेटेड वेगवेगळ्या वस्तू फक्त 50 रुपयांपासून मिळतात.
advertisement
ट्रेकर्स अड्डा यांच्याकडे सध्याच्या घडीला वेगवेगळ्या किल्ल्यांच्या नावांच्या बॅचचा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या टी-शर्टला किंवा बॅगला हे वेगवेगळ्या नावाचे बॅच लावू शकता. या बॅचची किंमत फक्त 50 रुपये आहे. ट्रेकर्स अड्डा यांच्याकडे तुम्हाला फक्त 400 रुपयांपासून वेगवेगळ्या स्टाईलचे ट्रेकिंग रिलेटेड टी-शर्ट विकत मिळतील. या टी-शर्टमध्ये 50 पेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील.
advertisement
तसेच ट्रेकर्स अड्डा यांच्याकडे तुम्हाला सीडबॉल देखील विकत मिळेल. जेव्हा आपण कोणतेही फळ खातो तेव्हा त्या फळांच्या बिया आपण फेकून देतो. मात्र त्या फळांच्या बिया न फेकता त्याच्यात माती मिसळून त्याचे सीडबॉल तयार केले जातात. या सीडबॉलच्या आधारे तुम्ही घरी किंवा तुम्हाला हवे त्या ठिकाणी छोटे रोपटे लावू शकता. अनेकदा मोठ्या झाडांमध्ये देखील तुम्ही या सीडबॉलचा उपयोग करू शकता.
advertisement
महाराष्ट्राचा इतिहास आणि गड किल्ल्यांचा इतिहास हा लहान मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा यासाठी ट्रेकर्स अड्डा कार्यरत आहे. सध्याच्या घडीला त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे त्यांनी वहीवर गडकिल्ल्यांचे नाव आणि माहिती दिली आहे. वहीच्या सुरुवातीला किल्ल्याचे नाव असेल तर वहीच्या मागे किल्ल्यावर कोणत्या वास्तू बघण्यासारखा आहे याची माहिती दिली असेल. तसेच वहीच्या आत किल्ल्याची इतर माहिती देखील दिली असेल. वहीची किंमत साधारण 40 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
याव्यतिरिक्त ट्रेकर्स अड्डा यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रिलेटेड वेगवेगळ्या फ्रेम्स तुम्हाला विकत मिळतील. या फ्रेम्सची किंमत साधारण 500 रुपये पासून सुरू होते. जर तुम्हाला ट्रेकर्स अड्डा यांच्याकडून कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 14, 2025 6:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
टी-शर्टपासून ते बॅच, ट्रेकिंगच्या भन्नाट वस्तू, खरेदी करा 50 रुपयांपासून, Video