advertisement

Jalna : रोहिणी खडसेंच्या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना चोपलं, VIDEO

Last Updated:

जालन्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

jalana news
jalana news
Jalana News : रवि जयस्वाल, प्रतिनिधी, जालना : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सूरू आहे. या रणधुमाळीत राज्यातील बडे नेते, आमदार, खासदार प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. अशाच एका जालन्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
जालन्यात रोहिणी खडसेंच्या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. अंबडमध्ये काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेवेळी हा प्रकार घडलाय. महिला कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता.
अंबड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून श्रद्धा चांगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे जालन्यातील अंबड शहरात प्रचार सभेसाठी आल्या होत्या. या सभेवेळी काही महिला कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं.या हाणामारीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
सुरूवातील एक महिलेच दुसऱ्या महिलेशी बोलणं सूरू होतं. हे बोलण संपताच दुसऱ्याच क्षणी एका महिलेचे एका तिसऱ्या महिलेसोबत शाब्दीक बाचाबाची झाली. या बाचाबाचीत दोघांनी एकमेकांसोबत झटापटी देखील झाली. यावेळी व्यासपिठावरून महिला कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्लाही देण्यात आला होता. पण तरीही ही हाणामारी सूरूच होती. शेवटी आयोजकांनी मध्यस्थी केल्यानंतर महिलांमधील वाद मिटला आहे.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
Jalna : रोहिणी खडसेंच्या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना चोपलं, VIDEO
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement