advertisement

Ambernath Nagar Parishad : राडा, हाणामाऱ्या, पळवापळवींनी गाजली! अंबरनाथ नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली, कारण काय?

Last Updated:

Maharashtra Local Body Election : राडा-हाणामारी आणि पदाधिकार्‍यांची पळवापळवी या गाजत असलेली ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

Rapid Read
राडा, हाणमाऱ्या, पळवापळवींनी गाजली, अंबरनाथ नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली, कारण काय?
राडा, हाणमाऱ्या, पळवापळवींनी गाजली, अंबरनाथ नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली, कारण काय?
ठाणे: शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रंगलेला वाद, राडा-हाणामारी आणि पदाधिकार्‍यांची पळवापळवी या गाजत असलेली ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. हायव्होलटेज ड्रामा असलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार उद्या संपणार होता. मात्र, काही तास आधीच निवडणूक ढकलण्यात आल्याने आता उमेदवारांचे टेन्शन आणखीच वाढणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे होता. सोमवारी तोफा थंडावणार आहेत. मात्र, त्याआधीच अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पदावरील तांत्रिक वादाचा थेट परिणाम आता अंबरनाथकरांना अनुभवायला मिळणार आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुका २ डिसेंबरला होणार होत्या; मात्र संबंधित वादावर दाखल झालेल्या अपीलामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल करत मतदानाची तारीख तब्बल १८ दिवसांनी पुढे ढकलली आहे. आता अंबरनाथमध्ये मतदान २० डिसेंबर रोजी होणार आहे.
advertisement
अंबरनाथ नगराध्यक्ष पदावरून निर्माण झालेल्या तांत्रिक वादाने गेल्या काही दिवसांत स्थानिक राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. नगराध्यक्षांच्या पात्रतेसंदर्भात दाखल झालेल्या अपीलामुळे निवडणूक कार्यक्रमावर अनिश्चिततेचे ढग दाटून आले होते. अखेर निवडणूक आयोगाने सर्व बाजूंचा विचार करून संपूर्ण प्रक्रियेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असल्यामुळे २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.
advertisement

बदलापूरमधील या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली...

अंबरनाथ शिवाय, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील ६ प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १५ ब, १७ अ, १० ब, ८ अ, ५ ब, १९ अ या प्रभागांचा समावेश आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उभ्या राहिलेल्या अपीलांच्या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाने निर्णायक पाऊल उचलले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विविध आदेशांविरुद्ध काही उमेदवारांनी दाखल केलेल्या न्यायालयीन अपीलांमुळे काही नगरपरिषद व नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया अडकली होती. अशा ठिकाणी आता २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
Ambernath Nagar Parishad : राडा, हाणामाऱ्या, पळवापळवींनी गाजली! अंबरनाथ नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली, कारण काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement