Corona Update: कोरोना परत आलाय, ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा 24 तासांमध्ये मृत्यू

Last Updated:

मुंबईसह ठाण्यामध्ये कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरायला लागला आहे. ठाणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

file photo
file photo
ठाणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच ठाण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.  कळवा रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल झालेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती  समोर आली आहे.
मुंबईसह ठाण्यामध्ये कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरायला लागला आहे. ठाणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात शनिवारी एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती.
मुंब्रा येथे राहणारा वसीम सय्यद (वय 21) हा तरुण मधुमेह आजाराने त्रस्त होता. त्याच्या रक्तातील साखर नियंत्रित होत नसल्यानं त्याला त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली असता कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  वसीम सय्यदला गुरुवारी  कळवा रुग्णालयात कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात दाखल करण्यात आलं होतं.  शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती चिंताजनक झाली.  अखेरीस शनिवार  २४ मे रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
advertisement
तर कळवा रुग्णालयात कोरोना कक्षात आणखी एक गर्भवती महिला कोरोनाची लागण झाली असून उपचार सुरू आहे. या महिलेच्या अंगातील ताप कमी झाला असून तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहे. या महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता प्रकाश बोरुडे यांनी दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Corona Update: कोरोना परत आलाय, ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा 24 तासांमध्ये मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement