Jayakwadi Dam: मराठवाड्याचं टेन्शन मिटलं! जायकवाडीतून मोठी अपडेट, गोदावरीत 6388 क्युसेक पाण्याचा विसर्ग
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. सध्या धरणाचे 12 दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.
छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली होती. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ झाली आहे. शुक्रवारी (12 सप्टेंबर) दुपारपासून धरणात 7073 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. वाढत्या पाणीसाठ्याचा ताण लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने 27 पैकी 12 दरवाजे अर्धा फूटाने उघडले आहेत. या दरवाजांमधून 6388 क्युसेक पाणी नियंत्रित पद्धतीने गोदावरी नदीच्या पात्रात सोडलं जात आहे.
पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी लोकल 18 ला दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी धरणाचे 18 दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र, पावसाच्या पुनरागमनामुळे धरणातून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर) धरण परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण 99 टक्क्यांपर्यंत भरलं आहे. वाढत्या पाणी साठ्यामुळे 12 सप्टेंबर रोजी यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा मुख्य दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
advertisement
जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. पावसाचा जोर कमी-जास्त झाल्यानंतर विसर्ग नियंत्रित केला जातो. सध्या धरणाचे 12 दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. परिस्थितीनुसार विसर्गाचे प्रमाण वाढवलं किंवा कमी केलं जाणार आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पहिल्यांदा 31 जुलै रोजी धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा 21 ऑगस्टला विसर्ग करण्यात आला. दोन्ही वेळी एकत्रित 40 टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडलं गेलं. काल धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने तिसऱ्यांदा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 13, 2025 2:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jayakwadi Dam: मराठवाड्याचं टेन्शन मिटलं! जायकवाडीतून मोठी अपडेट, गोदावरीत 6388 क्युसेक पाण्याचा विसर्ग