advertisement

Farmer Success Story: 20 गुंठे शेतीतून मिळालं 150000 रुपये उत्पन्न, शेतकऱ्याने सांगितला यशाचा फॉर्म्युला

Last Updated:

Farmer Success Story: काही शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन नगदी पिके घेण्याला प्राधान्य देत आहेत. त्यातून त्यांना आर्थिक लाभही मिळत आहे.

+
Farmer

Farmer Success Story: 20 गुंठे शेतीतून मिळालं 150000 रुपये उत्पन्न, शेतकऱ्याने सांगितला यशाचा फॉर्म्युला

छत्रपती संभाजीनगर : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आजही अनेक लोक शेती करतात. मात्र, शेतीमध्ये पारंपरिक पिके घेतल्यास म्हणावा तितका आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन नगदी पिके घेण्याला प्राधान्य देत आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हसनाबादवाडी येथील शेतकरी हरिदास गाडेकर यांनी देखील आपल्या शेतात फुलशेतीचा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे या प्रयोगामुळे गेल्या सतरा वर्षांपासून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.
हरिदास गाडेकर यांनी 20 गुंठे क्षेत्रात 'अष्टगंधा' आणि 'पितांबरी' वाणाचा झेंडू लावला आहे. सध्या त्यांची फुलशेती बहरली असून फुलांची दररोज विक्री सुरू आहे. या फुलशेतीतून 1.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती गाडेकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली. फुल शेतीतून बाराही महिने उत्पादन घेता येतं. त्यामुळे गाडेकर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत विविध फुलांची शेती करतात. त्यांच्याकडे विहीर असल्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवत नाही.
advertisement
सामान्यपणे झेंडूची लागवड मे आणि जूनमध्ये केली जाते. फुलांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यास 'डेलिकेट', 'आकाया' आणि 'प्राईड' या कीटकनाशकांची फवारणी करता येते. याशिवाय फुलांवर बुरशी देखील लागते. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे फुलांवर बुरशीचा परिणाम झालेला नाही.
advertisement
फुल शेती करण्याचा विचार करत असलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची आणि देखभालीची माहिती घ्यावी. झेंडू असो किंवा इतर फुलझाडं त्यांची लागवड दाट केली तर बुरशीचा सामना करावा लागत नाही. शक्यतो जूनमध्येच फुलांची लागवड करायला हवी. उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यास ठिबक सिंचनचा वापर करून लागवड केली तरी चालते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या दरम्यान फुल शेतीतून समाधानकारक पैसे मिळतात, अशी माहिती गाडेकर यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Farmer Success Story: 20 गुंठे शेतीतून मिळालं 150000 रुपये उत्पन्न, शेतकऱ्याने सांगितला यशाचा फॉर्म्युला
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement