Hit and Run: हिट अँड रनच्या घटना थांबेनात, नवी मुंबईत इनोव्हा चालकाने केलं कांड
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
राज्यातील हिट अँड रनच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. आता नवी मुंबईच्या वाशीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे...
प्रमोद पाटील, प्रतिनिधी
वाशी, नवी मुंबई: राज्यातील हिट अँड रनच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. नवी मुंबईच्या वाशीमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आलं आहे.
इनोव्हा चालकाने रिक्षाला उडवलं:
नवी मुंबईतील वाशीमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. यामध्ये एका भरधाव इनोव्हा गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या अधिक तपास करत आहेत. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
Hit and Run: हिट अँड रनच्या घटना थांबेनात, नवी मुंबईत इनोव्हा चालकाने रिक्षाला उडवलं! pic.twitter.com/7DTaIhVydJ
— News18Lokmat (@News18lokmat) July 27, 2024
राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुणे, मुंबईच्या वरळीमधील हिट अँड रन प्रकरणानंतर नागपुरातून हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली होती. यामध्ये आऱोपी एक महिला कारचालक आहे. दोन ते तीन दुचाकींना या महिलेनं उडवलं असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
advertisement
खरंतर अशा बेधुंद वाहन चालकांना चाप लावण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. पोलीस यंत्रणा असो अथवा RTO विभागाने यांनी अशा बेफिकीर वाहनाचालकांबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अशा चालकांचा परवाना रद्द करणे, वाहन जप्त करणे असे उपाय करावेत अशी मागणी होताना दिसत आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
July 27, 2024 10:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hit and Run: हिट अँड रनच्या घटना थांबेनात, नवी मुंबईत इनोव्हा चालकाने केलं कांड


