इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय निवडला, कॉलेजसोबत सुरू केलेल्या साइड बिझनेसमधून लाखोंचं उत्पन्न

Last Updated:

नाशिकमधील 22 वर्षीय तरुण ओम कुमावत याने डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना, एक 'साइड बिझनेस' म्हणून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायातून त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे.

+
नोकरी

नोकरी नाही, फक्त उद्योग! नाशिकच्या तरुणाचे ‘फूड हब पाणीपुरी’चे यश

नाशिकमधील 22 वर्षीय तरुण ओम कुमावत याने डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना, एक 'साइड बिझनेस' म्हणून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायातून त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. इतरांच्या हाताखाली नोकरी न करता, स्वतःचा व्यवसाय वाढवून त्याला मोठे करण्याचे स्वप्न या युवा उद्योजकाने पाहिले आहे. 'लोकल 18' च्या माध्यमातून आपण त्याच्या व्यवसायाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
ओम एक होतकरू आणि कष्टाळू विद्यार्थी आहे. तो दहावीपासूनच काही ना काही काम करत आपला उदरनिर्वाह त्याने केला आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने एका चांगल्या कंपनीत कामही सुरू केले होते. मात्र, कॉलेजची वेळ आणि नोकरीची वेळ यांचा मेळ बसत नसल्याने ओमला ती नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडल्यानंतरच्या काळात ओमने इलेक्ट्रिशियनची कामंही केली. इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असा विचार त्याने केला.
advertisement
यातूनच त्याने खाद्यपदार्थांचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कॉलेजला जाताना व्यवसाय करणेही शक्य होईल. याच उद्देशाने त्याने 'फूड हब पाणीपुरी' नावाने आपले पाणीपुरी सेंटर सुरू केले. सकाळी कॉलेज आणि सायंकाळी आपली पाणीपुरीची गाडी लावून, हा तरुण त्याच्या पालकांना घर चालवण्यासाठी मदत करत असतो. त्याच्या पाणीपुरीच्या खास चवीमुळे तो अल्पावधीतच चांगलाच परिचित झाला. व्यवसाय उत्तमरित्या चालत असल्याने, इतरांच्या हाताखाली नोकरी का करावी? याऐवजी स्वत:चा व्यवसाय पुढे वाढवावा, असा विचार आता ओमचा झाला आहे.
advertisement
यासाठी तो त्याच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इतकेच नव्हे, तर ओम स्वत:चा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळून, केवळ स्वत:चे स्वप्न पूर्ण करत नाही, तर त्याच्याकडे काम करणाऱ्या लोकांचे घर चालवण्यासाठीही मदत करत आहे. "इतरांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा आपण आपले मालक बनावे", या ओमच्या विचाराने नाशिकमधील इतर तरुणांनाही प्रेरणा दिली आहे. यामुळे या तरुणाला नाशिकमध्ये एक 'युवा उद्योजक' म्हणून खास मान मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय निवडला, कॉलेजसोबत सुरू केलेल्या साइड बिझनेसमधून लाखोंचं उत्पन्न
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement