काही गटांनी अडथळे निर्माण केलेत... आदित्य ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांचं पत्र
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
मुंबई : सेस इमारतींच्या पुनर्विकास आणि पागडी भाडेकरू या विषयावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. स्वार्थी हितसंबंधित गटांनी या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहेत, अशी तक्रार त्यांनी पत्रातून केली आहे.
काही गटांनी अडथळे निर्माण केलेत...
सेस इमारतींच्या पुनर्विकास आणि पागडी भाडेकरू या विषयावर मी आपल्याला पुन्हा एकदा हे पत्र लिहीत आहे. मविआ सरकारने संबंधित कायद्यात सुधारणा करून, मालक अथवा भाडेकरू यांना, त्यांच्या इमारती जीर्णावस्थेत असल्यास, पुनर्विकासाच्या दिशेने पुढे जाण्याची मुभा दिली होती. परंतु, काही स्वार्थी हितसंबंधित गटांनी या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहेत.
advertisement
महोदय, सेस/पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी, या समस्येवर उपाय म्हणून अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्याची नम्र विनंती आहे. पुनर्विकासासाठी एक साधा निकष असावा- इमारतीचे वय.
मालकीच्या या प्रकारातील, १९६५ पूर्वी बांधलेल्या सर्व इमारतींना, त्या जीर्णावस्थेत आहेत किंवा नाहीत, याची पर्वा न करता, ठराविक कालमर्यादेत प्रथम मालक आणि त्यानंतर भाडेकरूंना पुनर्विकासाचा पर्याय व संधी देण्यात यावी. मी याबाबत आपणास यापूर्वीही पत्र लिहिले होते, कारण अशा हजारो मालमत्ता आणि त्यामध्ये राहणारे लाखो मुंबईकर हे सध्या मालक-भाडेकरू यांच्यातील मतभेदांमुळे पुनर्विकासापासून वंचित आहेत. आपण शासनाचे प्रमुख म्हणून वेळेवर हस्तक्षेप करून, इमारतीच्या वयानुसार पुनर्विकासाचा निकष ठरवल्यास, लाखो मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल, ही विनंती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काही गटांनी अडथळे निर्माण केलेत... आदित्य ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांचं पत्र