आजचं हवामान: 24 तासांत हवामानात होणार मोठे बदल, 75 KM वेगानं घोंगावतंय चक्रीवादळ, 21 जिल्ह्यांसाठी अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बिहार, राजस्थान, दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा.
उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी याची तीव्रता वाढू शकते. 5 आणि 7 ऑक्टोबर दरम्यान पश्चिमी विक्षोभ अधिक तीव्र होऊ शकतो. ज्यामुळे हवामानात मोठे बदल होतील. 6 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार आहे. महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होणार आहे. ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे. पाऊस झाला तरीसुद्धा हवामानात गारवा येणार नाही.
अरबी समुद्रातही घोंगावतंय वादळ
दुसरीकडे गुजरातजवळ देखील कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या 24 तासात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात देखील हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो महाराष्ट्राच्या दिशेनं सरकणार का याकडे हवामान विभागाचं लक्ष आहे. तसं झालं तर अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
मान्सूनची माघार कधी?
5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतीचा पाऊसही जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर अवकाळी पावसाचं संकट वादळामुळे राहील असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ऑक्टोबर हिटचा फटका सर्वाधिक रात्री बसू शकतो. महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटमध्ये कुठेही अति उष्ण तापमान राहणार नाही, मात्र दमट वातावरणामुळे उकाडा वाढेल आणि घामाचा धारा लागतील. त्यामुळे हैराण व्हायला होऊ शकतं. ला निनामुळे यावेळी कडाक्याची थंडी पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
कधी जाणार पाऊस?
विदर्भ, मराठवाड्याचा काही पट्टा इथून मान्सून परतीच्या पावसला सुरुवात झाली असून 10-12 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा असेल. आज कोकणपट्टा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहील.
advertisement
75 किमी वेगानं येतंय चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात अशांतता आहे. मान्सूनची माघार थांबली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. खरंतर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर खोल दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. किनारी भागात जोरदार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या भागात ताशी 65 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.
advertisement
महाराष्ट्रावरही चक्रीवादळामुळे परिणाम
हवामान खात्याने इशारा दिला आहे की शुक्रवारी, म्हणजे आज, चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यावरून छत्तीसगड, झारखंड आणि बिहारसह भारतातील अंतर्गत भागात पोहोचेल, ज्यामुळे मुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रात तयार झालेल्या खोल दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशवरही चक्रीवादळाची स्थिती आहे, ज्यामुळे राजस्थानपासून हरियाणा आणि नंतर दिल्लीपर्यंत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 6:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: 24 तासांत हवामानात होणार मोठे बदल, 75 KM वेगानं घोंगावतंय चक्रीवादळ, 21 जिल्ह्यांसाठी अलर्ट