मुंबईकरांनो, स्वेटर ठेवा! विदर्भासह मध्य महाराष्ट्रात तापमान ५ अंश खाली, थंडीचा हा जोर आणखी किती दिवस?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिकमध्ये थंडीची लाट असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तापमान ५ अंश सेल्सिअसने खाली. तमिळनाडूमध्ये अतिवृष्टीचा इशारा.
स्वेटर पांघरुन शॉल सोडा आता घरातच शेकोटी आणि हिटर पेटवावा लागतोय इतकी कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबईसह उपनगरातही बोचरा वारा आहे. त्यामुळे हुडहुडी भरली आहे. पहाटेपासून थंड वारे वाहात असल्याने अंगाला थंडी बोचत आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आजही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात अचानक थंडीचा कडाका वाढला असून, हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासाठी आजही थंडीची लाट येणार असल्याचं सांगितलं. विशेषतः पुणे, नाशिकसारख्या भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. किमान तापमान मोठ्या प्रमाणात खाली आल्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तापमान ५ अंश सेल्सिअसने खाली
मागील २४ तासांच्या नोंदीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोवा या भागांमध्ये किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा सुमारे ५ अंश सेल्सिअसने खाली आले आहे. यामुळे येथील नागरिकांना अचानक थंडीचा मोठा अनुभव येत आहे. यासोबतच, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्येही आज थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना सकाळच्या वेळी जास्त थंडीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
पुढील ४ दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता
सध्याची ही शीत लहरीची स्थिती पुढील २४ तास कायम राहील. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, त्यानंतर लगेचच पुढील चार दिवसांत राज्यात तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीच्या कडाक्यातून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशाच्या दक्षिण भागात मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
फक्त मध्य महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्येही आज एका-दोन ठिकाणी शीत लहरींचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात शीत लहरींची स्थिती कायम राहील, यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मात्र, पुढील २४ तासांनंतर तापमान स्थिर राहील आणि त्यानंतरच्या चार दिवसांत तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
एकीकडे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलेला असताना, दक्षिण भारतात मात्र वेगळेच चित्र आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तमिळनाडूमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये १९ ते २४ नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे वादळी वाऱ्यासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह अति मुसळधार पाऊस होणार आहे. समुद्र खवळल्याने मासेमारी कऱण्यासाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात तूर्तास पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 6:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईकरांनो, स्वेटर ठेवा! विदर्भासह मध्य महाराष्ट्रात तापमान ५ अंश खाली, थंडीचा हा जोर आणखी किती दिवस?


