Guess Who : बॉलिवूडची ट्रेंड सेटर, बोल्ड लुकने उडवली झोप, 2 लग्नही मोडली; ही अभिनेत्री कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bollywood Actress : फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची ट्रेंड सेटर आहे. तिच्या बोल्ड लुक्सने 70-80 चा काळ गाजवला होता. फोटोमध्ये खुर्चीत बसलेली ही चिमुरडी आता 73 वर्षांची झाली आहे.
70-80 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या करिअरच्या काळात अनेक हिट सिनेमे दिले पण त्याचबरोबर त्यांनी असं काही केलं की ज्यामुळे एक ट्रेंड सेट झाला. फोटोमध्ये दिसणारी ही गोंडस अभिनेत्री देखील बॉलिवूडची ट्रेंड सेटर अभिनेत्री ठरली. आज ही अभिनेत्री 73 वर्षांची झाली आहे. आजही तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. या अभिनेत्रीनं त्या काळात आपल्या बोल्ड लुकने सगळ्यांची झोप उडवली होती. ज्या काळात अभिनेत्री स्लिव्ह लेस कपडे घालायला घाबरायच्या त्या काळात ती बिकिनीत शॉट देत होती. अभिनेत्रीचं हे धाडसी पाऊल नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिलं.
फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी आधी पत्रकार होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. मॉडेलिंग करत असताना ती अभिनेत्री म्हणून समोर आली. तिने दोन्ही क्षेत्रात नाव कामावलं. 1970 साली तिचा पहिली सिनेमा रिलीज झाला. त्या काळात तिच्याबरोबर काम करायला सगळेच निर्माते उत्सुक असायचे. अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना अभिनेत्रीची नाव अनेक अभिनेत्यांबरोबर जोडले गेली होती. पण तिने लग्न मात्र दुसऱ्याच कोणाशी केलं. पण तिचा संसार फार काळ टिकला नाही. डिवोर्सनंतर तिनं संपूर्ण आयुष्य एकटीनं घालवलं.
advertisement
फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून झीनत अमान आहे. आज त्या त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहे त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबईत झाला. "द एव्हिल विदिन" आणि "हलचल" सारख्या सिनेमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली.
advertisement
देव आनंद यांच्यामुळे झीनत अमानला खरी ओळख मिळाली. देव आनंद यांनी झीनत यांना त्यांच्या "हरे रामा हरे कृष्णा" सिनेमात भूमिका दिली आणि झीनत रातोरात स्टार झाल्या. "दम मारो दम", हे त्यांचं गाणं आजही जगप्रसिद्ध आहे. गाण्यातील त्यांच्या लुकची आजही कॉपी होते. त्या काळातील सर्वात धाडसी अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा आधुनिक चेहरा म्हटलं जात होतं.
advertisement

बोल्ड लुकने उडवली सगळ्यांची झोप
1970 - 1980 च्या दशकात त्यांनी स्लिट स्कर्ट आणि स्विमसूट घालून लोकांना चकित केले. झीनत अमान यांनी त्याकाळात ट्रेंड सेट केला. झीनत अमान यांनी इतर अभिनेत्रींना बोल्ड लूक स्वीकारणे सोपं केलं. "हीरा पन्ना" सिनेमात त्या थेट बिकिनी घालून आल्या अन् सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सत्यम शिवम सुंदरममधील बोल्ड अवताराने त्यांना आणखी एक नवी ओळख मिळवून दिली होती. त्यांच्या या भुमिकेवर आणि लुकवर बरीच टीका करण्यात आली होती.
advertisement
2 लग्न मोडली
सिनेमांइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यात देखील चर्चेत आलं. झीनत अमान आणि निर्माता संजय खानशी लग्न केलं होतं. संजय खान विवाहित असूनही त्यांच्याशी लग्न केलं होतं. दोघे अनेक पार्ट्यांमध्ये दिसायचे. पण संजय खान यांनी एका पार्टीनंतर हॉटेलमध्ये सर्वांसमोर झीनत यांना मारहाण केल्याचं बोललं जातं. लग्नाच्या एका वर्षातच झीनत आणि संजय खान वेगळे झाले.
advertisement
यानंतर, झीनत यांचं पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खानशी प्रेमसंबंध असल्याची अफवा पसरली. या नात्याबद्दल बरेच काही लिहिले गेले. दरम्यान झीनत यांनी मजहरशी लग्न केलं आणि इमरानने जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केलं तेव्हा या चर्चा संपुष्टात आल्या.
संजय आणि इम्रानपासून वेगळे झाल्यानंतर झीनत यांनी 1985 साली मजहरशी लग्न केले. मजहर त्यांना वारंवार मारहाण करत असे. त्यांना अजान आणि जहाँ ही दोन मुले देखील होती.12 वर्षांच्या संसारत खूप काही सहन केल्यानंतर झीनत यांनी मजहरपासून डिवोर्स घेतला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 6:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : बॉलिवूडची ट्रेंड सेटर, बोल्ड लुकने उडवली झोप, 2 लग्नही मोडली; ही अभिनेत्री कोण?


