आजचं हवामान: दक्षिणेकडे 2 वादळांचं संकट, 48 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दक्षिण भारतात सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळमध्ये पावसाचा धोका; महाराष्ट्रात सध्या उकाडा, पावसाचा इशारा नाही.
दक्षिण भारतात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळू शकतो. पुढचे 7 दिवस पाऊस राहणार आहे. महाराष्ट्रातून मान्सून गेला आहे. त्यामुळे ऊन वाढलं असून उकाडा देखील वाढला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांना धोका जास्त आहे. कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीलगत भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वारं फिरलं असून दक्षिणेत पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका
तूर्तास तरी महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा नाही. मात्र हे दोन्ही सायक्लोनिक सर्क्युलेशन आणखी तीव्र झाले तर मात्र महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. मान्सून परतीच्या पावसानं आधीच महाराष्ट्रात महापुराचं संकट आणलं होतं. आता थोडं त्यातून सावरत असताना पुन्हा अवकाळीचं संकट येऊ नये अशी प्रार्थना शेतकरी करत आहे.
advertisement
पुढचे 48 तास महत्त्वाचे
हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार शक्ती चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे खोल समुद्रात ते पुढे सरकल्याने आता अरबी समुद्र किनाऱ्यालगत कोणताही धोका नाही. दक्षिणेकडे वातावरणात कसे बदल होतात तिथले वारे महाराष्ट्रापर्यंत उलटे फिरले तर मात्र पावसाचा धोका आहे. हे पुढच्या 48 तासांत पाहावं लागणार आहे. मात्र सध्या तरी पावसाचा इशारा नाही.
advertisement
महाराष्ट्रात काय स्थिती?
हवामान विभागाचे तज्ज्ञ उमाशंकर दार यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ते 15 ऑक्टोबरपर्यंत दक्षिणेकडे रेड किंवा ऑरेंज अलर्ट सध्या तरी देण्यात आला नाही. 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात उकाडा राहणार आहे. पावसाचा इशारा नाही. ऑक्टोबर हिटला हळूहळू सुरुवात झाली आहे. दिवसा ऊन जरा जास्त आणि रात्रीही घामाच्या धारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
दुसरीकडे ला निनाचा यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे. अति पावसानंतर आता कडाक्याची थंडी यावेळी राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही कडाक्याची थंडी राहू शकते. प्रशांत महासागरातील ला निना वाऱ्यांचा परिणाम आशियातील हवामानावर होणार आहे. सध्या ऑक्टोबर हीटमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 7:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: दक्षिणेकडे 2 वादळांचं संकट, 48 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?