Weather Update : राज्यावर मोठं संकट ओढावणार! हवामान खात्याचा इशारा, 14 जिल्ह्यांसाठी हायअलर्ट

Last Updated:

आजचं हवामान: विकेणडच्या प्लॅनवर पाणी फिरणार, विकेण्डला फिरण्याचा प्लॅन रद्द करा नाहीतर फसाल! पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला थेट अलर्ट

News18
News18
राज्यात परतीच्या प्रवासाला लागलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्यांनी दिशा बदलली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम झाला. इतकंच नाही तर महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने तज्ज्ञ डॉ. सुप्रीत यांनी दिली. महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचे
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 25 ते 30 सप्टेंबर या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस मोठ्या प्रमाणात वाढेल. मागच्या चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामानातील बदलांमुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून, यामुळे मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे.
advertisement
डॉ. सुप्रीत यांनी दिली महत्त्वाची अपडेट
या आठवड्यात, विशेषतः वीकेंडला, पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
डॉ. सुप्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे पाच दिवस हवामान कसं राहणार आहे जाणून घेऊया.
advertisement
25 सप्टेंबर - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
26 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
advertisement
ऑरेंज अलर्ट- कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी
27 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर
28 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
advertisement
ऑरेंज अलर्ट- ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर,
29 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, ठाणे, मुंबई
30 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, ठाणे, मुंबई
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update : राज्यावर मोठं संकट ओढावणार! हवामान खात्याचा इशारा, 14 जिल्ह्यांसाठी हायअलर्ट
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement