टायर फुटला अन् ट्रॅक्टरवर आदळली क्रूझर, देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रूझर गाडीचा अपघात झाला, पाच भाविकांचा मृत्यू, तीन महिला मृत. सात ते आठ जण गंभीर जखमी, देवदर्शनासाठी निघाले होते. परिसरात शोककळा.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धारशिव: सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला आहे. टायर फुटल्याने एका क्रूझर गाडीचा ताबा सुटला आणि ती थेट पलटी झाली. या जीवघेण्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ज्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
देवदर्शनासाठी निघाले अन् घात झाला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील हे सर्व प्रवासी दक्षिण सोलापूर तालुक्यातील रहिवासी होते. हे सर्वजण सोलापूरहून नळदुर्ग येथील देवदर्शनासाठी क्रूझर गाडीतून जात होते. महामार्गावरून गाडी वेगात असताना अचानक क्रूझर गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. गाडी जागेवरच पलटी झाली आणि या पलटी झालेल्या क्रूझर गाडीची समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, यात पाच जणांचा जागीच अंत झाला.
advertisement
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पाचही व्यक्ती भाविक होत्या आणि देवदर्शनाच्या वाटेवर होत्या. अपघाताच्या तीव्रतेमुळे गाडीचा चक्काचूर झाला असून, यामध्ये तीन महिलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले होते.
advertisement
७ ते ८ जण गंभीर जखमी, सोलापूरकडे रवाना
view commentsया अपघातात क्रूझर गाडीतील सुमारे सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे स्वरूप पाहता जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिक बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र जखमींची संख्या मोठी असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 1:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टायर फुटला अन् ट्रॅक्टरवर आदळली क्रूझर, देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू


