महिंद्रा, स्वराज सगळेच फेल! मार्केटमध्ये या ट्रॅक्टरची 'बाहूबली' म्हणून ओळख, किंमत फीचर्स काय?

Last Updated:
John Deere 6120 B - सध्या देशभरातील बाजारात साधारणपणे 50 एचपी पर्यंतचे ट्रॅक्टर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात विकले जातात. शेतीची कामे, नांगरणी, रोटाव्हेटर, नांगर, ट्रॉली वाहतूक यासाठी अशा क्षमतेचे ट्रॅक्टर पुरेसे मानले जातात.
1/6
Tractor news
सध्या देशभरातील बाजारात साधारणपणे 50 एचपी पर्यंतचे ट्रॅक्टर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात विकले जातात. शेतीची कामे, नांगरणी, रोटाव्हेटर, नांगर, ट्रॉली वाहतूक यासाठी अशा क्षमतेचे ट्रॅक्टर पुरेसे मानले जातात. पण जगातील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर कोणता? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो. आज आपण त्याच ट्रॅक्टरबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत..
advertisement
2/6
tractor news
जॉन डीअर 6120 B - हा जॉन डीअर कंपनीचा सर्वात दमदार आणि पॉवरफुल ट्रॅक्टर असून 120 एचपी इंजिनची ताकद आणि जड यांत्रिक क्षमतेमुळे हा बाजारातील 'बाहूबली' ट्रॅक्टर मानला जातो. इतर ट्रॅक्टर सामान्यतः 60 ते 75 एचपी क्षमतेपर्यंत असले तरी जॉन डीअर 6120 B या सर्व मर्यादा ओलांडतो. यामध्ये 4 सिलेंडरचे 120 एचपी इंजिन असून ते 2400 आरपीएमवर प्रचंड पॉवर निर्माण करते. याशिवाय 102 एचपी PTO (Power Take-Off) असल्याने जड शेती उपकरणे किंवा औद्योगिक अटॅचमेंट्स सहज चालतात. त्यामुळे हा ट्रॅक्टर केवळ शेतीपुरताच नव्हे तर विविध जड यंत्रसामग्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
advertisement
3/6
tractor news
3650 किलो वजन उचलतो - वजनाच्या बाबतीतही हा ट्रॅक्टर दुसऱ्या कोणत्याही मॉडेलपेक्षा सरस आहे. याचे एकूण वजन 4500 किलो असून उचलण्याची क्षमता तब्बल 3650 किलो आहे. साधारणपणे बाजारातील ट्रॅक्टर 2000 ते 2500 किलोपर्यंत ओढू शकतात, परंतु 6120 B ही मर्यादा सहज पार करतो. त्यामुळे मोठ्या ट्रॉली, कल्टीवेटर, सबसॉइलर, डोझर, हार्वेस्टर जॉइंट मशीनरी यासाठी तो विशेष पसंतीचा ठरतो.
advertisement
4/6
tractor news
या ट्रॅक्टरमध्ये Heavy Duty 4WD ड्राइव्ह असून मोठे टायर्स 470 मिमीचा ग्राउंड क्लीयरन्स प्रदान करतात. 2560 मिमी व्हीलबेस, 4410 मिमी लांबी आणि 2300 मिमी रुंदी असल्यामुळे हा ट्रॅक्टर संतुलित, स्थिर आणि कोणत्याही भूप्रदेशावर चालण्यास सक्षम आहे. कार्यक्षमतेसोबतच हे वैशिष्ट्य कठीण आणि दगडी जमिनीतही अधिक पकड देतात.
advertisement
5/6
फीचर्स काय?
फीचर्स काय? -  या ट्रॅक्टरची सर्वात चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे त्याची 220 लिटर क्षमतेची इंधन टाकी. एकदा टाकी भरल्यानंतर वारंवार इंधन भरण्याची गरज भासत नाही आणि लांबवेळ ट्रॅक्टर चालवताना खर्च व वेळ दोन्ही बचत होते. त्यामुळे हा मॉडेल इंधन-कार्यक्षम श्रेणीतही अग्रस्थानी आहे. जॉन डीअर 6120 B मध्ये 12 फॉरवर्ड व 4 रिव्हर्स गीअर्स, सिंक्रोमेश ड्युअल क्लच सिस्टम, पॉवर स्टीअरिंग, ऑइल इमर्स्ड ब्रेक्स, तसेच ड्युअल एलिमेंट प्री-क्लीनर एअर फिल्टर देण्यात आले आहे. ही वैशिष्ट्ये ट्रॅक्टरचे ऑपरेशन सोपे, सुरक्षित आणि टिकाऊ बनवतात.
advertisement
6/6
किंमत काय?
किंमत काय? -  मोठ्या इंजिनमुळे या ट्रॅक्टरची किंमत देखील प्रीमियम श्रेणीत मोडते. किंमत 32.50 लाख ते 33.90 लाख रु इतकी आहे. कंपनीकडून 5 वर्षे वॉरंटी देण्यात येते.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement