Ahmednagar city Vidhan Sabha: संग्राम जगताप महायुतीचा नगर सुभा राखणार की शरद पवारांचे कमळकर सुभेदार होणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Election Ahmednagar city : मागील दोन टर्म आमदार असलेले अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांच्यासमोर शरद पवार गटाचे अभिषेक कमळकर यांचे आव्हान आहे.
अहिल्यानगर : पश्चिम महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक वर्षं ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्यांच्याकरताच प्रचार करण्याची वेळ सामान्य कार्यकर्त्यांवर आली आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ हा खरं तर एके काळी पश्चिम महाराष्ट्रातला शिवसेनेचा बालेकिल्ला होता. 1990 पासून 2009 पर्यंत सलग वीस वर्षं सेनेचे अनिल राठोड विधानसभा जिंकून आमदार झाले होते. 2014 ला चित्र बदललं. राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनी राठोडांचा पराभव करत नगरा सुभा जिंकला आणि गेली 10 वर्ष ते नगरचे आमदार आहेत. जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे या वेळी ते महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने नगर शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अभिषेक कळमकर यांना देण्यात आली आहे. वास्तविक नगर शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असताना देखील ही जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. युती आणि आघाडी दोन्हीकडचे शिवसैनिक या वर्षी नाराज आहेत. या नाराजीचा फटका कुठल्या राष्ट्रवादीला अधिक बसणार यावरून ही जागा कोण जिंकणार हे ठरेल.
advertisement
2019 विधानसभा निकाल
संग्राम जगताप - राष्ट्रवादी – 81,217
अनिल राठोड – शिवसेना - 70,078
2024 लोकसभा निवडणुकीला काय झालं?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभेत भाजपला पराभव पत्करावा लागला. निलेश लंके जाएंट किलर ठरले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांना शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांनी पराभूत केलं. शरद पवार लंकेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले तर निलेश लंकेंविरोधात अजित पवार स्वतः प्रचार करत होते. आणि त्यांच्या निमित्तानेच काका-पुतण्यांमधील संघर्ष सगळ्यांना दिसला होता.
advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचं सध्याचं बलाबल
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत.
1. अकोले - किरण लहामटे (राष्ट्रवादी)
2. संगमनेर -बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
3. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
4. कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
5. श्रीरामपूर - लहू कानडे (काँग्रेस)
advertisement
6. नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष) आता शिवसेना (उबाठा)
7. शेवगाव पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप)
8. राहुरी - प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी)
9. पारनेर - निलेश लंके (राष्ट्रवादी) सध्या रिक्त
10. अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
11. श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
12. कर्जत जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2024 2:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahmednagar city Vidhan Sabha: संग्राम जगताप महायुतीचा नगर सुभा राखणार की शरद पवारांचे कमळकर सुभेदार होणार?


