Ahmednagar : अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, वर्षभरापूर्वीच सुरू केली होती रेल्वेसेवा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
हमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये ही आग भडकली असून धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.
अहमदनगर, 16 ऑक्टोबर : अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये ही आग भडकली असून धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर आष्टी रेल्वेला नगर तालुक्यातल्या शिराडोह परिसरात आग लागली. रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये ही आग भडकली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही अशी माहिती समजते. आग लागल्याच्या घटनेनंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झालं आहे.
advertisement
वर्षभरापूर्वीच अहमदनगर आष्टी ही रेल्वे सुरु करण्यात आली होती. रेल्वे विद्युतीकरणासाठी काही काळ बंद करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेल्वेसेवा सुरू झाली होती. या रेल्वेला म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नव्हता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2023 4:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar : अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, वर्षभरापूर्वीच सुरू केली होती रेल्वेसेवा


