लग्न मोडलं म्हणून तरुणानं आयुष्यच संपवलं; आधी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् मग..

Last Updated:

संगमनेरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जमलेलं लग्न मोडल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे.

News18
News18
संगमनेर, 30 ऑगस्ट, हरिश दिमोटे : संगमनेरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जमलेलं लग्न मोडल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. नितीन सीताराम खुळे (वय 32, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नावं आहे. नितीन यानं तालुक्यातील वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नितीनच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नितीन खुळे या तरुणाचं लग्न ठरलं होतं. मात्र ते काही कारणांमुळे मोडलं. लग्न मोडल्यामुळे निराश झालेल्या नितीन यानं तालुक्यातील वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान दुसरीकडे गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या दहशतीमुळे नितीन याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणानं एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये त्याने आपली व्यथा मांडली होती. तसेच पोलिसांना त्याच्याजवळ जी सुसाईड नोट आढळून आली आहे, त्या सुसाईड नोटमध्ये त्याने ज्यांच्याकडून त्याला त्रास होत होता त्यांची नावं लिहून ठेवली आहेत. या प्रकरणात प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध कलम 306, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
लग्न मोडलं म्हणून तरुणानं आयुष्यच संपवलं; आधी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् मग..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement