Accident News : पुणे-नाशिक हायवेवर ट्रक कारवर कोसळला, चौघांचा जागीच मृत्यू, मृतेदह बाहेर काढायला क्रेनची मदत
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर, 17 डिसेंबर : पुणे-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 15 दिवसांपूर्वीच पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावर अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. माल वाहतूक ट्रक कारवर कोसळला काल त्याखाली दबली गेली. या घटनेत अकोले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की क्रेनने कार तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांह रांगा उभ्या राहिल्या आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला.
advertisement
15 दिवसांपूर्वी याच मार्गावर तिघांचा मृत्यू
सटाणा तालुक्यातील सायखेडा येथून पुण्याकडे निघालेल्या जीपने पाहाटे पाचच्या सुमारास ट्रकला मागून धडक दिली. दाट धुक्यामुळे जीपचालकाला अंदाज आला नाही. जीप चालक पंकज खंडु जगताप (वय 36), मधुकर तुकाराम अहिरे (वय 52), शांताराम संभाजी अहिरे (वय ५० सर्व रा. सायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिकः) यांचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले होते.
Location :
Ahmadnagar Cantonment,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Dec 17, 2023 9:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Accident News : पुणे-नाशिक हायवेवर ट्रक कारवर कोसळला, चौघांचा जागीच मृत्यू, मृतेदह बाहेर काढायला क्रेनची मदत





