'त्या' दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होणार, अनेक आमदार भाजपच्या संपर्कात; दरेकरांचा मोठा दावा

Last Updated:

काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

प्रवीण दरेकरांचं मोठं वक्तव्य
प्रवीण दरेकरांचं मोठं वक्तव्य
अहमदनगर, 30 जुलै, हरिष दिमोटे :  भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज शिर्डीमध्ये येऊन सहकुटुंब साईबाबाचं दर्शन घेतलं. मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनला येत असतो, महाराष्ट्राच्या विकासासाठी साईबाबांना प्रार्थना केली. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्याची शक्ती बळीराजाला दे असं साकडं आपण साईबाबांना घातल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमंक काय म्हणाले दरेकर  
जो पक्ष विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही, तो लोकसभेच्या 24 जागा कशा जिंकणार असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्याच्यामध्ये समन्वय आणि एकवाक्यता नाही. आमच्याशी लढताना ते विरोधी पक्षनेता ठरू शकत नाहीयेत. त्यांची हातबलता समोर आली आहे. विरोधी पक्षनेता निवडीच्या दिवशी काँग्रेसमध्ये मोठा स्फोट होणार आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावाही यावेळी दरेकर यांनी केला आहे.
advertisement
उद्धव ठाकरेंवर निशाणा  
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात पहिल्यांदा मराठी माणसांचा मेळावा घ्यायला हवा होता. मात्र मराठी माणसं जमतील का नाही यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला, असा खोचक टोला दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'त्या' दिवशी काँग्रेसमध्ये स्फोट होणार, अनेक आमदार भाजपच्या संपर्कात; दरेकरांचा मोठा दावा
Next Article
advertisement
Supreme Court On Local Body Election : आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश...
आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व
  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

View All
advertisement