भिडे गुरुजींचा भाजपशी संबंध नाही, फडणवीसांनी केला त्या वक्तव्याचा निषेध; काँग्रेसलाही इशारा

Last Updated:

संभाजी भिडेच काय कोणीच कोणीच असे वक्तव्य करू नये. करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे निश्चितपणे संताप तयार होतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा फडणवीस यांनी केला निषेध
भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा फडणवीस यांनी केला निषेध
मुंबई, 30 जुलै : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. तर अमरावतीत गुन्हाही दाखल केला गेला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. संभाजी भिडे गुरुजी यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो असं फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य अनुचित आहे. संभाजी भिडेच काय कोणीच कोणीच असे वक्तव्य करू नये. करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे निश्चितपणे संताप तयार होतो.
advertisement
लोक महात्मा गांधीच्या विरुद्ध बोललेलं कधीही सहन करणार नाहीत. राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कुणाबद्दल आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांनाही इशारा दिला आहे.
संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याच काही कारण नाही. ज्या पद्धतीने या वक्तव्याचा काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल गल्लीछ शब्दात राहुल गांधी बोलतात. त्याचाही निषेध कॉंग्रेसवल्यानी त्यांनी केला पाहिजे. त्यावेळी मात्र ते मिंदे होतात. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधीचा अपमान सहन केला जाणार नाही असेही फडणवीस म्हणालेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिडे गुरुजींचा भाजपशी संबंध नाही, फडणवीसांनी केला त्या वक्तव्याचा निषेध; काँग्रेसलाही इशारा
Next Article
advertisement
Dharashiv News : 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिवचं वातावरण तापलं
'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव
  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

View All
advertisement