लग्न होऊन ४ दिवस झाले नाही, तोच कुटुंबाचा आधार गेला; नवरदेवाच्या डोळ्यांदेखत कुटुंबातील ५ जणांचा अंत!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बार्शी-लातूर महामार्गावर घारी शिवारात ट्रक-कार अपघातात कांबळे आणि वाघमारे कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, अनिकेत आणि मेघना बचावले, परिसरात शोककळा.
प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: लग्नानंतर कुलदैवताचे दर्शन घेऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्याच्या मार्गावर नियतीने क्रूर घात केला आहे. विवाह सोहळा नुकताच पार पडलेल्या नवदाम्पत्याला घेऊन तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात असलेल्या कारला भीषण अपघात झाला. बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावर घारी शिवारात भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चार दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर अनिकेत आणि मेघना हे नवदांपत्य पनवेलहून कुर्डूवाडी येथील मामांना घेऊन कुलदैवताच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे जात होते. बार्शी-लातूर महामार्गावर घारीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभळबेट येथील पुलावर ही दुर्घटना घडली. भरधाव मालट्रकने समोरून कारला जोरदार धडक दिली आणि होत्याचे नव्हते झाले.
advertisement


