माझ्या जीवात जीव आला... राशिनमध्ये रोहित शर्माचं मराठीतून भाषण, लोकांच्या टाळ्या शिट्ट्या थांबेना!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rohit Sharma: रोहित शर्मा याने मराठीतून भाषण करत उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळवली.
राशीन-कर्जत (अहमदनगर) : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने गुरुवारी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री जगदंबा देवी मातेच्या पवित्र भूमीत राशीन येथे ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतीय संघाला टी ट्वेन्टी वर्ल्ड कप जिंकून देणारा, यशस्वी कर्णधार रोहित शर्मा याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. रोहित पवार यांच्या होमग्राऊंडवर रोहित शर्माने केलेली बॅटिंग पाहून क्रीडा रसिकही आनंदून गेले.
यावेळी रोहित शर्मा याने मराठीतून भाषण करत उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळवली. मागील तीन चार महिने भारतीय संघासाठी अतिशय चांगले होते. तीन महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला नमवून भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. टी ट्वेन्टी प्रकारातील विश्वचषक जिंकणे हे आम्हा सर्व भारतीय खेळाडूंचे लक्ष्य होते. विश्वचषक जिंकल्यावर माझ्या जरासा जीवात जीव आला.... असे रोहित शर्मा म्हणताच क्रीडा रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली. तसेच रोहित शर्माच्या म्हणण्याला शिट्ट्यांनी समर्थन दिले. क्रीडा रसिकांचे प्रेम पाहून रोहित शर्मा भारावून गेला.
advertisement
पुढचे शुबमन गिल, बुमराह-यशस्वी जयस्वाल याच मातीतून येतील- रोहित शर्मा
आज राशीनमध्ये क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले. क्रिकेट खेळ जगभरात लोकप्रिय आहे. ग्रामीण भागात सुरू होत असेलल्या क्रीडा अकादमीतून भविष्यातील शुबमन गिल, बुमराह-यशस्वी जयस्वाल तयार होतील. याच मातीतून पुढचे क्रिकेट खेळाडू दिसतील, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला.
माझे मराठी एवढेच होते... तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिले... याबद्दल सगळ्यांचे आभार असे म्हणत रोहित शर्माने आपल्या भाषणला पूर्णविराम दिला. रोहित शर्मा बोलत असताना प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पाडला. रोहित पवार यांनाही हसायला रोहित शर्माने भाग पाडले.
advertisement
रोहित राऊत आणि श्रावणी महाजनच्या आवाजाने सोहळ्याला चार चाँद
view commentsक्रीडा संकुलाच्या उद्घाटन सोहळ्यात मनोरंजनाचीही जोरदार रंगत होती. प्रसिद्ध डीजे क्रेटेक्स, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि मधुर आवाजाची धनी श्रावणी महाजन या कलाकारांच्या सादरीकरणाने सोहळ्याची अधिकच रंगत वाढली.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 03, 2024 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
माझ्या जीवात जीव आला... राशिनमध्ये रोहित शर्माचं मराठीतून भाषण, लोकांच्या टाळ्या शिट्ट्या थांबेना!


