Crime : भाडे दिले नाही, रुममेटची भिंतीवर डोके आपटून केली हत्या; शिर्डीत धक्कादायक घटना

Last Updated:

श्रीनिवास शेट्टी यांनी भाडे न दिल्याने धर्मेंद्र मेहताने मारहाण केली. त्याने श्रीनिवास शेट्टींचे डोके भिंतीवर जोरजोरात आपटले.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
हरीष दिमोटे,अहमदनगर : भाडे न दिल्याने रूममेटनेच एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे. शिर्डीतील देशमुख चारी इथल्या वसाहतीत भाडोत्री राहत होते. इथं ७४ वर्षीय श्रीनिवास शेट्टी यांचा रुममेटनेच खून केल्याने खळबळ उडाली आहे. रुमचे भाडे न दिल्याने हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी धर्मेंद्र मेहता याला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिर्डी शेजारच्या देशमुख चारी येथील वसाहतीत श्रीनिवास शेट्टी आणि धर्मेंद्र मेहता हे भाड्याने रूम घेऊन राहत होते. श्रीनिवास शेट्टी यांनी भाडे न दिल्याने धर्मेंद्र मेहताने मारहाण केली. त्याने श्रीनिवास शेट्टींचे डोके भिंतीवर जोरजोरात आपटले. यात गंभीर जखमी झालेल्या श्रीनिवास शेट्टी यांचा मृत्यू झाला
श्रीनिवास शेट्टी आणि धर्मेंद्र मेहता यांच्यात घरभाडे देण्यावरून वाद झाला होता. तेव्हा रागाच्या भरात धर्मेंद्र मेहता या ४० वर्षांच्या आरोपीने श्रीनिवास यांचे डोके भिंतीवर जोरजोरात आपटले. गंभीर जखमी झालेल्या वृद्ध श्रीनिवास शेट्टी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. या प्रकरणी घरकाम करणाऱ्या अलका चव्हाण यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Crime : भाडे दिले नाही, रुममेटची भिंतीवर डोके आपटून केली हत्या; शिर्डीत धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement