रुग्णालय आहे तर डॉक्टर नाही, रुग्णवाहिका आहे तर डिझेल नाही; मातेनं गमावला जीव

Last Updated:

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यानं गर्भवतीला आपला जीव गमवावा लागला आहे.

News18
News18
अहमदनगर, 8 ऑगस्ट, हरीष दिमोटे : अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे एका गर्भवती तरुणीला जिव गमवावा लागला आहे. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे एका गर्भवती तरुणीने जीव गमावल्याची घटना घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील अशोक राणू वाघ यांची मुलगी रेणुका गांगुर्डे हिला गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी चासनळी येथील कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी नेण्यात आलं. सदर आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. तीला अतिशय वेदना होत असल्याने धामोरी येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यासाठी सांगण्यात आले. रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली नाही, रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचं कारण देण्यात आलं.  त्यांनंतर तिला एका खासगी वाहनातून धामोरी येथे प्रसूतीसाठी नेण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर अती रक्तस्त्राव झाल्यामुळे तरुणीने जीव गमावला, बाळ मात्र सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
advertisement
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी याच आरोग्य केंद्रात रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या गेटवरच झाली होती. डॉक्टर नसल्यानं सर्वसामान्य रुग्णांनी कुठे जायचं असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
advertisement
दरम्यान असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी रुग्णालयात निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी, आणि या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मृत तरुणीच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी  तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप यांनी कारवाडी येथे भेट देऊन डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणी पीडित कुटुंबीयांचा जबाब घेतला आहे. अहवालाची प्रतीक्षा असून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होईल असं अश्वासन आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
रुग्णालय आहे तर डॉक्टर नाही, रुग्णवाहिका आहे तर डिझेल नाही; मातेनं गमावला जीव
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement