World Blood Day 2025: लग्न जुळवताना रक्तगट बघणं का गरजेचं? सारखा असल्यावर काय होतात परिणाम? Video

Last Updated:

लग्न जुळवताना गुरूकडे जाऊन गुण जुळवले जातात आणि त्यानंतर लग्न ठरवतात. पण फक्त गुण नाही, तर रक्तगट काय आहे हे बघणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

+
News18

News18

अहिल्यानगर: लग्न जुळवताना गुरूकडे जाऊन गुण जुळवले जातात आणि त्यानंतर लग्न ठरवतात. पण फक्त गुण नाही, तर रक्तगट काय आहे हे बघणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लग्न जुळवताना रक्तगट बघणं का गरजेचं आहे? याबद्दलचं डॉक्टर सुरेश जेजुरकर यांनी माहिती दिली आहे.
लग्न जुळवताना रक्तगट हा बघितला पाहिजे. कारण जर मुलीचा रक्तगट हा निगेटिव्ह असेल आणि मुलाचा पॉझिटिव्ह असेल, तर होणाऱ्या बाळाला अनेक अडचणी येऊ शकतात. त्या बाळाला कावीळ किंवा अ‍ॅनिमिया होऊ शकतो किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये, बाळाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लग्न जुळवताना रक्तगट बघणं गरजेचं आहे, असं डॉक्टर सुरेश जेजुरकर सांगतात.
advertisement
रक्तगटाबद्दल अधिक माहिती
आपल्या मानव जातीत चार प्रकारचे रक्तगट असतात. O पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, A पॉझिटिव्ह आणि B पॉझिटिव्ह आणि त्या प्रत्येकात आरएच निगेटिव्ह पण असतो. म्हणजे आठ प्रकारचे रक्तगट आढळून येतात. त्यात पॉझिटिव्ह रक्तगट हा लवकर मिळतो, परंतु निगेटिव्ह रक्तगट हा अगदी कमी प्रमाणात असतो.
advertisement
तसेच AB रक्तगट हा युनिव्हर्सल अ‍ॅक्सेप्टर असतो. म्हणजे AB रक्तगटाला कोणताही रक्तगटाचे रक्त चालू शकतं. परंतु O रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर असतो. म्हणजे O रक्तगट हा सर्वांना चालू शकतो, परंतु O रक्तगटाला फक्त O रक्तगटच रक्त चालू शकतं.
निरोगी माणूस दर सहा महिन्यातून रक्तदान करू शकतो. रक्तदान केल्यानंतर जितका रक्त आपण देणार आहोत, ते जवळपास दीड महिन्याच्या आत शरीरामध्ये पुन्हा तयार होतं आणि रक्तदान करणं आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे रक्तदान हे सुरक्षित आहे.
advertisement
रक्तगट आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो जाणून घेणे अनेक वैद्यकीय आणि वैयक्तिक कारणांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे लग्न जुळवताना रक्तगट तपासणे गरजेचे मानले जाते, असं डॉक्टर सुरेश जेजुरकर सांगतात.
मराठी बातम्या/अहमदनगर/
World Blood Day 2025: लग्न जुळवताना रक्तगट बघणं का गरजेचं? सारखा असल्यावर काय होतात परिणाम? Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement