MCA ची बिनविरोध निवडणूक कशी झाली? पवार-फडणवीसांच्या भेटीत काय ठरलं? अजिंक्य नाईक म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
MCA Election: ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत योग्य वाटाघाटी करून अजिंक्य नाईक यांच्या मार्गातले अडथळे दूर केले गेले.
मुंबई : देशातील क्रिकेट संघटनांपैकी अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांनी सलग दुसऱ्यांदा निवड झाली. अध्यक्षपदासाठी यंदा अनेक दिग्गज राजकारणी नेत्यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत योग्य वाटाघाटी करून नाईक यांच्या मार्गातले अडथळे दूर केले गेले. अर्ज माघारी घ्यायला पाच-दहा मिनिटे शिल्लक असताना भाजप नेते प्रसाद लाड, सेना नेते विहंग सरनाईक, क्रिकेटर डायना एडल्जी यांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
MCA ची बिनविरोध निवडणूक कशी झाली? पवार-फडणवीसांच्या भेटीत काय ठरलं?
अजिंक्य नाईक यांच्या निवडीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले असे नाईक म्हणाले. खेळात राजकारण न आणता क्रिकेटच्या दृष्टीने योग्य निवड व्हावी, याकडे त्यांचा कटाक्ष होता. निवडणूक प्रक्रियेत आशिष शेलार यांचेही सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक बिनविरोध पार पडली, असे अजिंक्य नाईक म्हणाले.
advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली. यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार या दोघांचेही असे म्हणणे होते की गेले काही काळ काम अतिशय व्यवस्थित सुरू आहे, ते यापुढेही व्यवस्थित सुरू राहावे, ही त्यांची इच्छा होती. मुंबई क्रिकेट संघटना हे आमचे कुटुंब आहे, निवडणुका होत असतात. काही वादविवाद पण होत राहतात. पण आपण करत राहायचे असते, असे नाईक म्हणाले.
advertisement
अजिंक्य नाईक यांच्या निवडीला विरोध, प्रकरण कोर्टात, उद्या निकाल
अजिंक्य नाईक यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. यावर बोलताना नाईक म्हणाले, आज न्यायालयात अंतरिम स्टे दिलेला नाही. त्यामुळे निर्णय काय होईल ते तुम्हाला कळेलच.
अध्यक्षांना शुभेच्छा, पूर्ण बॉडीही निवडून येईल-प्रसाद लाड
अजिंक्य नाईक यांना मी शुभेच्छा देतो. त्यांना ११ महिन्याचा कालावधी मिळाला होता. येत्या काळात ते चांगले काम करतील. अमोल काळे यांची कामे पुढे नेतील. पूर्ण बॉडी निवडून येईल, त्यांनाही शुभेच्छा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 5:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MCA ची बिनविरोध निवडणूक कशी झाली? पवार-फडणवीसांच्या भेटीत काय ठरलं? अजिंक्य नाईक म्हणाले...


