Maharashtra Local Body Election: महायुतीमध्ये वादाचा वणवा पेटला! शिंदे गटाची आम्हाला गरज नाही, अजितदादा गटाच्या नेत्यानं सुनावलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Local Body Election: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये वादाचा वणवा पेटल्याचे दिसत आहे.
संतोष दळवी, प्रतिनिधी, कर्जत: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये वादाचा वणवा पेटल्याचे दिसत आहे. राज्यात तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले तरी स्थानिक पातळीवरील वाद तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाचीही आम्हाला गरज नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने सांगितले आहे.
advertisement
रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण आहे. पालकमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांनी आपला दावा ठोकला आहे. भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना आता शिंदेंच्या इतर आमदारांनी तटकरेंवर हल्लाबोल केला. मागील काही महिन्यांपासून शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक घडत आहे.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महायुतीतील मतभेद चिघळताना दिसत आहेत. रोहा येथे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
भरत भगत यांनी दळवींवर टीका करताना म्हटले, “हाथी चले बाजार, कुत्ते भुके हजार” या उक्तीप्रमाणे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी भुंकले. त्यांचा पूर्वेतिहास बघावा. दळवी हे शेकापचे सरपंच होते, परंतु शेकापने त्यांना ओळखून बाजूला केले. त्यानंतर दळवींनी सुनील तटकरे यांचे पाय पकडून राजकारणात स्थिरता मिळवली. त्यामुळे अशा वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा सुनिल तटकरे यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही.”
advertisement
याशिवाय, भगत यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेद अधोरेखित करताना म्हटले की, “हे लोक राष्ट्रवादीला वगळून राजकारणाच्या गप्पा करतात. आम्हालाही शिंदे सेनेची काहीही गरज नाही आणि त्यांच्या सोबत राजकारण करण्याची इच्छा नाही.”
रायगड जिल्ह्यातील या राजकीय वादामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीतील समन्वय कितपत साधला जाणार, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट हे रायगडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
advertisement
Location :
Karjat,Raigad,Maharashtra
First Published :
September 30, 2025 2:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Local Body Election: महायुतीमध्ये वादाचा वणवा पेटला! शिंदे गटाची आम्हाला गरज नाही, अजितदादा गटाच्या नेत्यानं सुनावलं