अजितदादा मविआसोबत येऊन भाजपला टक्कर देणार? पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या घडामोडी, पवारांचा खास माणूस दादांच्या भेटीला

Last Updated:

Pimpari Chinchwad Mahapalika Election: पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारीही भाजपविरोधात लढण्यासाठी मविआसोबत जाण्याला अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शरद पवार-अजित पवार
शरद पवार-अजित पवार
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तुषार कामाठे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन मविआसोबत एकत्र निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव अजित पवार यांना दिला आहे. भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र या, अशा सूचना पक्षाकडून मिळालेल्या असल्याने अजित पवार यांची भेट घेतल्याचे कामाठे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या प्रस्तावानंतर अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या समोर प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे तगडे आव्हान आहे. २०१७ सालच्या निवडणुकीत अजित पवार यांच्याकडून भाजपने महापालिका हिसकावून घेतली होती. याचेच उट्टे काढण्याची संधी अजित पवार यांना चालून आली आहे. मी वसवलेले शहर भाजपच्या हाती गेले, अशी खंत अनेकदा अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारीही भाजपविरोधात लढण्यासाठी मविआसोबत जाण्याला अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement

तुषार कामाठे यांनी घेतली अजित पवार यांची भेट

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढावी यासाठी अजित पवारांची घेतल्याचे तुषार कामठे यांनी सांगितले. महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढावी, अशी प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement

भ्रष्टाचारी भाजपला थांबवायचे असेल तर सोबत लढू

महापालिका निवडणूक लढताना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रवादीकडून आम्हाला दिले होते. त्यामध्ये जे शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे पक्ष आहेत, जे भाजप विरोधात निवडणूक लढू शकतात अशा संघटनांना आणि पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असे आम्हाला सांगण्यात आले होते. याच मागणीला पुढे घेऊन निवडणूक लढविण्यासाठी आमच्या शहराचा प्रस्ताव घेऊन अजित पवार यांची भेट घेतली, असे तुषार कामाठे यांनी सांगितले.
advertisement
महानगरपालिका निवडणूक आपण सोबत लढली तर भ्रष्टाचारी भाजपला थांबवू शकतो हा आमचा प्रस्ताव मी अजितदादांना दिला. मला पक्षातून कोणाचाही निरोप नव्हता. प्रदेश वरून तसे काही आम्हाला सूचितही करण्यात आलेले नव्हते. स्थानिक पातळीवर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, असे आदेश आम्हाला दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच पुण्यात घोषित केले की भाजप आणि राष्ट्रवादी सोबत लढणार नाहीत. म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत प्रस्ताव घेऊन अजित पवार यांच्याकडे आलो होतो, असे कामाठे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा मविआसोबत येऊन भाजपला टक्कर देणार? पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या घडामोडी, पवारांचा खास माणूस दादांच्या भेटीला
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement