मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू कसा झाला? PM रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Last Updated:

Jay Malokar Post Mortem Report: आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेल्या मनसे पदाधिकारी जय मालोकार याच्या मृत्यूला वेगळे वळण लागले आहे.

जय मालोकर पीएम रिपोर्ट
जय मालोकर पीएम रिपोर्ट
अकोला : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा हृदयविकाराचा झटक्याने मुत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मात्र त्याचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नसून त्याला प्रचंड मारहाण झाल्याने त्याचा अंत झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अकोल्यातील जय मालोकर हा मनसे कार्यकर्ता होता. अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने राज्यभरातील मनसे कार्यकर्ते नेते प्रचंड संतापले होते. अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या गाडीला शासकीय विश्रामगृहात लक्ष्य केले. मिटकरी यांच्या गाडीवर जय मालोकर याने हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता. मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर काही वेळातच मालोकर याचा मृत्यू झाला होता.
advertisement
आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेल्या मनसे पदाधिकारी जय मालोकार याच्या मृत्यूला वेगळे वळण लागले. जय मालोकार याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले गेले. मात्र आता मालोकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मनसे कार्यकर्ता मालोकरचा मृत्यू कसा झाला? PM रिपोर्ट समोर
जयच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्याच्या बरगड्या देखील फ्रॅक्टर होत्या, असेही शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. मानेवर प्रचंड मारहाणीमुळे त्याच्या मज्जूतंतूवर गंभीर इजा झाली होती. शवविच्छेदनावेळी त्याच्या डोक्याला आणि मेंदूला मोठ्या प्रमाणावर सूज होती, असेही समोर आले आहे.
advertisement
जयला कुणी मारले?
शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अकोला पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरायला सुरूवात झाली आहे. पोलिसांनी लगोलग जयला मारहाण कुणी केली? या दिशेने तपासाला सुरूवात केली आहे. लवकरच आम्ही जयच्या मारेकऱ्यांना पकडू, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात जाऊन जयच्या कुटुबियांची भेट घेतली होती
जयच्या मृत्यूनंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात जाऊन जयच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. तसेच या संपूर्ण प्रकाराची योग्य चौकशी होऊन जयच्या कुटुंबियांना न्याय मिळावी, अशी मागणी केली होती. जयच्या कुटुंबियांना यावेळी काही आर्थिक स्वरुपाची मदत करण्यात आली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू कसा झाला? PM रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement