मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

Last Updated:

राज्यव्यापी शाळा बंदचा पुण्यातून एल्गार करण्यात आला आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर फक्त 12 दिवसच असणार सुट्टी, नेमकं कारण काय?
विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर फक्त 12 दिवसच असणार सुट्टी, नेमकं कारण काय?
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे :  महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता (staffing approval) संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शाळा बंद राहणार आहे. राज्यव्यापी शाळा बंदचा पुण्यातून एल्गार करण्यात आला आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.
advertisement
पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मागण्यांसाठी असणार आहे संप

advertisement
  • राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये
  • 15 मार्च 2024 रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे
  • शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी

कसं असणार आहे आंदोलन?

5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहतील. यात सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती, शिक्षक भारती, मुख्याध्यापक महामंडळ आणि इतर 100 हून अधिक संघटना या आंदोलनात सामील होणार आहेत.
advertisement

मागण्या पूर्ण होत नसल्याने संपाचा इशारा

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement