Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, 3 डिसेंबरला होणारी पाणीकपात रद्द

Last Updated:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, 3 डिसेंबरला होणारी पाणीकपात रद्द
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, 3 डिसेंबरला होणारी पाणीकपात रद्द
गेल्या काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई महानगर पालिकेने भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याच्या कामाची घोषणा केली होती. अद्याप ही हे काम प्रलंबितच आहे. परंतु आता हे काम महानगर पालिकेने रद्द केले आहे. येत्या 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महिपरिनिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत आहे.
या कारणाने बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात लागू करण्याचे नियोजन होते.
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियोजित आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्‍याकामी काही कामे प्रस्‍तावित आहेत. त्‍यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्‍यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्‍के घट होणार आहे.
advertisement
याचा परिणाम म्‍हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्‍तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्‍तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरा‍तील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात केली जाणार होती. त्यामुळे बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात लागू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
advertisement
तथापि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी मुंबई महानगरात येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा, 3 डिसेंबरला होणारी पाणीकपात रद्द
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement