धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला सनी देओल, सोशल मीडियावर दिली भावुक रिॲक्शन, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sunny Deol First Reaction after Dharmendra Death: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ८ दिवसांनंतर धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल, बॉबी देओल आणि पुतण्या अभय देओल यांनी सोशल मीडियावर भावनिक रिॲक्शन दिली आहे.
मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती, पण देओल कुटुंबातील सदस्यांनी सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता ८ दिवसांनंतर धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल, बॉबी देओल आणि पुतण्या अभय देओल यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिसाद दिला आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर शेअर केला भावुक व्हिडीओ
धर्मेंद्र यांच्या आठवणी आणि त्यांच्या कलाप्रवासाचा गौरव करण्यासाठी देओल कुटुंबाने २७ नोव्हेंबर रोजी बांद्रा येथील ताज लँड्स एंड येथे 'सेलिब्रेशन ऑफ लाईफ' नावाची प्रार्थना सभा आयोजित केली होती. या प्रार्थना सभेत धर्मेंद्र यांना एक खास म्युझिकल ट्रिब्यूट देण्यात आले होते. ब्युटी फोटोग्राफर टीना देहल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून धर्मेंद्र यांच्या अविस्मरणीय फोटोंचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
टीना देहल यांनी या व्हिडिओसोबत लिहिले, "या जादूसाठी धन्यवाद. इतक्या लहान वयात आम्हा सर्वांना चित्रपटांच्या जादूची ओळख करून दिल्याबद्दल, आम्ही सर्वांनी या जादूचे अनुसरण केले. काहींनी कॅमेऱ्यासमोर, काहींनी कॅमेऱ्यामागे... ही जादू आजही जिवंत आहे."
advertisement
advertisement
सनी देओलची पहिली प्रतिक्रिया
वडिलांच्या निधनानंतर सनी देओलने या व्हिडिओवर पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया दिली आहे, जी अत्यंत भावनिक आहे. सनी देओलने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना केवळ लाल रंगाच्या हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. वडिलांचे प्रेम आणि आठवणी व्यक्त करण्यासाठी त्याने शब्दांऐवजी भावनांचा आधार घेतला.

advertisement
सनी देओलसोबतच अभिनेता बॉबी देओल आणि चुलत भाऊ अभय देओल यांनीही याच व्हिडिओवर रेड हार्ट इमोजी पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सनी देओलच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, "तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात की, तुमच्या कुटुंबात इतके सुंदर व्यक्ती होते. आतापर्यंतची सर्वात देखणी व्यक्ती." अनेक युजर्सनी देओल कुटुंबाला सांत्वना दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 7:03 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला सनी देओल, सोशल मीडियावर दिली भावुक रिॲक्शन, VIDEO


