पराभव बाजूला राहिला, मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा छेडलं, शिवसेना मविआतून बाहेर पडणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता कधी होतील माहिती नाही. पण शिवसैनिकांनी ताकदीने आता 288 जागांवर सक्रीय झाले पाहिजे. आणि 33 लोकसभेच्या जागांवर मतदार तेच आहेत,असे दानवेंनी म्हटलं आहे.
मुंबई :ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बुधवारी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. दानवेंच्या या विधानानंतर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल? मविआत फूट पडेल? अशा चर्चांना ऊत आलं होतं.यात भरं म्हणून आता दानवेंनी कोणतं खातं मिळेल? कोण मुख्यमंत्री होईल? यामध्ये काँग्रेस जास्त उत्सुक होती. यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच नावं जाहीर केलं असतं तर कदाचित निवडणुकीत मविआला अधिक फायदा झाला असता, अशी खंत अंबादास दानवेंनी बोलून दाखवली आहे.त्यामुळे दानवेंच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आले आहे.
अंबादास दानवे माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर कांग्रेसमध्ये अती आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे कोणतं खातं मिळेल? कोण मुख्यमंत्री होईल? यामध्ये काँग्रेस जास्त उत्सुक होती. यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच नावं जाहीर केलं असतं तर कदाचित निवडणुकीत मविआला अधिक फायदा झाला असता, अशी नाराजी अंबादास दानवेंनी मांडली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता कधी होतील माहिती नाही. पण शिवसैनिकांनी ताकदीने आता 288 जागांवर सक्रीय झाले पाहिजे. आणि 33 लोकसभेच्या जागांवर मतदार तेच आहेत,असे दानवेंनी म्हटलं आहे. तसेच स्वबळाच्या विधानावर बोलताना दानवे म्हणाले की, मुंबई आणि स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत परिस्थिती स्थानिक राजकारण वेगवेगळ्या प्रकारचे असते.स्थानिक स्तरावर ह्या चर्चा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या हाती अपयश आलं आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे.अशी चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. या चर्चेवर बोलताना दानवे म्हणाले की, ठाकरे एकत्र होणे शक्यच नाही. आणि याबाबत कोणताही चर्चा नाही. तसेच मनसे कोणासोबत कोणाविरुद्ध होती हेच स्पष्ट नव्हते. त्यामुळे भुमिका स्पष्ट नसल्याने सैन्याने नेमकं करायचे याबाबत संभ्रम होता, असा चिमटा दानवेंनी मनेसला काढला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2024 2:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पराभव बाजूला राहिला, मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा छेडलं, शिवसेना मविआतून बाहेर पडणार?