अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा दिलासा, भाजपला जोरदार धक्का, नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर
- Published by:Akshay Adhav
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
अंबरनाथ नगरपरिषदेचा नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून सुधारित कार्यक्रम फक्त नगराध्यक्ष आणि ९ वॉर्डांनाच लागू होणार आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी, अंबरनाथ (ठाणे) : राज्यातील सर्वाधिक चर्चित अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेला मोठा दिलासा मिळालेला आहे. आयोगाने नगरपरिषदेचा नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सुधारित कार्यक्रम फक्त नगराध्यक्ष आणि ९ वॉर्डांनाच लागू होणार आहे. नव्याने कोणालाही अर्ज करता येणार नाही. तर, मंजूर अर्जापैकी कोणाला माघार घ्यायची असेल तर ती घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मानला जातोय. कारण, अर्ज छाननीत भाजपाच्या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. निवडणूक स्थगित झाल्याने नवीन कार्यक्रमात नव्याने अर्ज भरण्याची मुभा दिली जाऊ शकते अशी शिवसेनेत चर्चा होती. यामुळे अर्ज अवैध ठरलेल्या भाजपाच्या ५ पैकी २ उमेदवारांना जीवदान मिळेल, असेही बोलले जात होते.
advertisement
ज्यांचे अर्ज बाद आहेत ते बादच राहणार, नव्याने कोणाला अर्ज करता येणार नाही
6 ब आणि 7 अ या दोन वॅार्डांची निवडणूक नव्याने जाहीर करण्यात आली होती. या दोन्ही वॉर्डातील भाजपाचे अर्ज बाद अवैध ठरवण्यात आले होते. पण, नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार ज्यांचे अर्ज बाद आहेत ते बादच राहणार शिवाय नव्याने कोणाला अर्ज करता येणार नाही, जे मंजूर अर्ज आहेत त्यांना फक्त अर्ज मागे घेण्याची मुभा आहे.
advertisement
भाजपला जोरदार धक्का
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळालाय तर भाजपाला पुन्हा धक्का मानला जातोय. अंबरनाथ नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाकरता आणि २ ब, ३ ब, ४ अ, ४ ब, ४ क, ६ अ, ६ ब, ७ अ आणि ८ ब या वॉर्डात हरकत घेऊन न्यायालयात अपील करण्यात आले होते. न्यायालयाचा निकाल उशीरा आल्याने २ डिसेंबर मतदानाच्या २ दिवस आधी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता २० डिसेंबरला मतदार आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
advertisement
24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सदस्यांची निवडणूक 20 डिसेंबरला
सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
December 04, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा दिलासा, भाजपला जोरदार धक्का, नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर


