Ambarnath: अंबरनाथमध्ये गेम कुठे फिरला? शिवसेनेनं नगराध्यक्षपद कसं गमावलं? कारण समोर
- Reported by:AJIT MANDHARE
- Published by:Sachin S
Last Updated:
अति आत्मविश्वास या सारख्या गोष्टींमुळे शिवसेनेला नगराध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं. गड आला पण नगराध्यक्ष पद गेलं, अशी परिस्थिती आता शिवसेनेची झाली
अंबरनाथ : वाद आणि गोळीबाराच्या घटनेमुळे गाजलेली अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक अखेरीस पार पडली. भाजपाने या निवडणुकीत नगराध्यक्ष पद पटकावलं आहे पण नगरसेवक मात्र शिवसेनेचे जास्त निवडून आले आहेत. तर भाजप नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांना ५४ हजार ०९३ मतं मिळाली. पण संपूर्ण २९ प्रभागात शिवसेनेचा पडलेली मतं ही भाजपा नगराध्यक्षाला पडलेल्या मतांपेक्षा ही जास्त असून ती ५८ हजार २४९ मतं आहे. ज्यामुळे अंबरनाथकरांनी पसंती ही शिवसेनेला दिली असली तरी भाजपने नगराध्यक्षपद पटकावलं आहे. पण शिवसेनेकडून नगराध्यक्षपद गेलं याची आता अनेक कारणं समोर आली आहे.
...म्हणून नगराध्यपद गमावलं
वाद आणि प्रतिष्ठेच्या अशा अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं पूर्ण ताकदपणाला लावली होती. पण, नगराध्यक्ष पदाकरता शिवसेनेनं नवीन चेहरा दिला पाहिजे होता. त तर, विधानसभेत आपल्याच उमेदवाराच्या विरोधात वाळेकरांनी काम केल्यानं नगरपरिषद निवडणुकीत त्यांना पाहिजे तशी साथ लाभली नाही. त्यात मारामारी धमकी, गोळीबार, अति आत्मविश्वास या सारख्या गोष्टींमुळे शिवसेनेला नगराध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं. गड आला पण नगराध्यक्ष पद गेलं, अशी परिस्थिती आता शिवसेनेची झाली. असं असतानाही अंबरनाथकरांनी शिवसेनेला केलेली मतं यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वानं अंबरनाथ शहरांच्या विकासाकरता वचननाम्यात दिलेली आश्वासनं पुर्ण करुन अंबरनाथकरांचे आभार मानायचे असं ठरवलंय.
advertisement
या विषयी आम्ही खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, 'हा निकाल अत्यंत सकारात्मक घेतला असून जरी आम्हाला नगराध्यक्षपद मिळालं नसलं तरी अंबरनाथकरांनी आम्हाला जो ५८ हजार २४९ मतांचा कौल दिला आहे, त्याची आम्ही परतफेड करू आणि अंबरनाथ शहराचा चेहरा मोहरा बदलू' असा विश्वास व्यक्त केला.
advertisement
शिवसेनेत होणार बदल
view comments'या निकालातून अनेक अनुभव आले असून संघटना मजबुतीकरता शिवसेना आता पाऊलं उचलणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे नगराध्यक्ष जरी भाजपचा असला तरी शिवसेनेचं २७, काँग्रेसचे १४, अजित पवार गटाचे ४ आणि अपक्ष दोन यांना भाजपाला पदेपदी सामोरं जावं लागणार असंच दिसतंय.
Location :
Ambarnath,Thane,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 6:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ambarnath: अंबरनाथमध्ये गेम कुठे फिरला? शिवसेनेनं नगराध्यक्षपद कसं गमावलं? कारण समोर









