Eknath Shinde Ajit Pawar : शेवटच्या क्षणी शिंदेंना संधी, अजितदादांना डावललं, किल्ले रायगडावर काय झालं?

Last Updated:

Eknath Shinde Ajit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगड दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. फडणवीस आणि शिंदे उपस्थित होते. अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही.

News18
News18
रायगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात दाखल झाले होते. आज, अमित शाह यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगडचा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यातून हेलिकॉप्टरने रायगडमध्ये आले. रायगडमध्ये आल्यानंतर अमित शाह यांनी पाचड गावात जात जिजामाता यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर अमित शाह हे रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावर दाखल झाले. अमित शाह यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शाह यांना शिंदे शाही पगडी आणि कवड्याची माळ देत त्यांचा सन्मान करण्यात आला. अमित शाह यांच्या आजच्या या कार्यक्रमात मोजक्याच नेत्यांची भाषणे झाली.
advertisement

अजितदादांना डावलले, एकनाथ शिंदेंना संधी....

रोपवे मधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोबत रोप-वे प्रवास करत किल्ले रायगडाकडे मार्गस्थ झाले होते. अमित शाह यांच्या कार्यक्रम पुत्रिकेनुसार राज्य सरकारमधून फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे भाषण करणाऱ्या वक्त्यांच्या यादीत नव्हती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली. तर, अजितदादा यांना मात्र संधी देण्यात आली नसल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या विशेष विनंतीची आता चर्चा सुरू झाली आहे.
advertisement

पुण्यात शाह आणि फडणवीस-शिंदे यांच्यात चर्चा...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर जाण्याआधी पुण्यात दाखल झाले. पुण्यात रात्री त्यांनी विश्रांती घेतली. याच दरम्यान रात्री उशिरा अमित शाह यांच्यासोबत मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत अमित शाह यांच्यासोबत राज्यातील राजकारण आणि विशेषत: पालकमंत्री पदाबाबतच्या तिढ्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Ajit Pawar : शेवटच्या क्षणी शिंदेंना संधी, अजितदादांना डावललं, किल्ले रायगडावर काय झालं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement