Amravati News : लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Amravati Groom Death News : कोतवाल म्हणून शासकीय सेवेत असलेले अमोल गोड यांचा विवाह पुसला येथे नुकताच मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. वधू-वर एकमेकांना हार घालून लग्नाचे विधी पार पडले अन् मोठा अनर्थ घडला.
Amravati Wedding News : अमोलच्या लग्नाची लगबग सुरू झाली. नवरी तयार होऊन बसली... नवरदेवाची वरात कार्यालयाच्या दारात आली. लग्न लागलं... वऱ्हाड्यांनी जेवणावर ताव मारला अन् अर्ध्या तासात मोठा अनर्थ घडला. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावात असं काही घडलं ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
शेवट हृदयद्रावक शोकांतिकेत
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ज्या घरात काही वेळापूर्वी सनईचा आवाज गुंजत होता, तिथे काही क्षणातच अत्यंत शांतता आणि निशब्दता पसरली. एका लग्नसोहळ्याचा शेवट अत्यंत हृदयद्रावक शोकांतिकेत झाला आहे. अमोल गोड नावाच्या नवरदेवाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली होती.
advertisement
चक्कर आली आणि मंडपात कोसळले
कोतवाल म्हणून शासकीय सेवेत असलेले अमोल गोड यांचा विवाह पुसला येथे नुकताच मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. वधू-वर एकमेकांना हार घालून लग्नाचे विधी पार पडले आणि वधू-वरांना उपस्थितांकडून शुभेच्छा मिळत होत्या. याच आनंदी वातावरणात नवरदेव अमोल गोड यांना अचानक चक्कर आली आणि ते मंडपात कोसळले. लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात हा प्रकार घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ माजली.
advertisement
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अमोल गोड यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी पाहुण्यांनी मोठी धावपळ केली. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अमोल गोड यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे. ज्या वधूच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद क्षणार्धात हिरावला गेला, तिच्यासह वर आणि वधूच्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका कर्तृत्ववान तरुणाचा झालेला हा दुर्दैवी अंत संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 26, 2025 8:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati News : लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू


