आई-वडिलांचा डिवोर्स, संघर्षात गेलं बालपण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचा पहिला मॉडेल, कोण आहे हा?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेता लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करत आहे. बालपणी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर त्याच्या वाट्याला संघर्ष आला. पण या संघर्षावर मात करत तो आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचा पहिला मॉडेल झाला.
अर्जुन रामपाल हे बॉलिवूडमधील असं नाव आहे ज्याचे एकेकाळी आंतरराष्ट्रीय पातळीवर मॉडेलिंगमध्ये जोरदार वर्चस्व होते आणि आजही तो एखाद्या दिग्गजापेक्षा कमी नाही. अर्जुन रामपाल कधीच सिनेसृष्टीपासून दूर गेला नाही. तो सतत छोट्या पण प्रभावी भूमिका करत राहिला आहे. अलीकडेच राणा दग्गुबातीसोबतच्या राणा नायडू या सीरिजमध्ये तो दिसला. आता धुरंधरमधील दमदार लुक प्रचंड वायरल होत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटात अर्जुन रामपाल एक जबरदस्त भूमिका साकारताना दिसणार आहे.
advertisement
अर्जुन रामपालचा जन्म जबलपूरमध्ये झाला. तो शाळेत असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि तो आईसोबत राहिला. त्याची आई एक शालेय शिक्षिका होती, त्यामुळे त्याच वातावरणात त्याचे शिक्षण झाले. पुढे कॉलेजसाठी तो दिल्लीला आला. एके दिवशी तो एका पार्टीला गेला आणि तिथेच त्याची भेट डिझायनर रोहित बाल यांच्याशी झाली.
advertisement
रोहित बाल यांच्या सोबत त्यांनी मॉडेलिंग शोमध्ये भाग घेतला आणि तो हिट ठरला. 1994 मध्ये त्याला सोसायटीचा ‘फेस ऑफ द इयर’ हा किताब मिळाला. त्यानंतर त्याने मॉडेलिंगच्या जगात मोठं नाव कमावलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवणारा भारताचा पहिला मॉडेल ठरला. कधीकाळी अर्जुन रामपालची तुलना जॉन अब्राहमशीही केली जायची.
advertisement
अर्जुन रामपालनं मॉडेलिंगसोबतच अभिनयातही काम सुरू केलं. 1997 मध्ये तो किन्ना सोणा या गाण्यात दिसला. त्यानंतर डोंट मॅरी मायया म्युझिक व्हिडिओतही त्याने छाप पाडली. 2001 मध्ये 'प्यार इश्क मोहब्बत' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही, पण अर्जुन रामपाल लोकांच्या नजरेत मात्र आला.
advertisement
advertisement
अर्जुन रामपालने गेल्या दहा वर्षांत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, पण त्याला योग्य ती प्रसिद्धी मिळू शकली नाही. याचं कारण म्हणजे त्यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. 2015 मध्ये आलेल्या रॉय चित्रपटात तो रणबीर कपूरसोबत दिसला, पण हा चित्रपटही फारसा चालला नाही. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले, पण बहुतेक फ्लॉप ठरले. तरीही अर्जुन रामपाल सतत ओटीटी आणि चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका करत राहिला. राणा नायडूमध्ये त्यांचं काम खूपच कौतुकास्पद ठरलं.
advertisement


