Marriage Astro: तो शुभ विवाहच नव्हे! या 4 तारखांना बांधलेल्या लग्नगाठी फार काळ टिकत नाहीत, अशुभ तिथी

Last Updated:

Happy Marriage Life Tips: शास्त्र-परंपरेनुसार श्री हरी विष्णू योग निद्रेमधून जागे झाल्यानंतर विवाहाचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळातील शुभ मुहूर्तावर लग्न करणाऱ्यांना खूप आनंदी वैवाहिक जीवन मिळतं, प्रेम आणि नातेसंबंध निर्विघ्न असतात.. पण,

News18
News18
मुंबई : तुळशी विवाह-प्रबोधिनी एकादशीपासून लग्नसराई सुरू झाली आहे. सध्या लग्नांचा हंगाम जोरात सुरू असून त्यासाठी आवश्यक असणारे शुभ दिवस उपलब्ध आहेत. शास्त्र-परंपरेनुसार श्री हरी विष्णू योग निद्रेमधून जागे झाल्यानंतर विवाहाचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळातील शुभ मुहूर्तावर लग्न करणाऱ्यांना खूप आनंदी वैवाहिक जीवन मिळतं, प्रेम आणि नातेसंबंध निर्विघ्न असतात, असं मानलं जातं. पण आज आपण वर्षातील कोणत्या तारखा लग्नविधीसाठी अशुभ, अयोग्य मानल्या जातात, याविषयी जाणून घेऊ. हिंदू धर्मात या तारखांना लग्न टाळण्याचा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देतात.
शुक्र अस्त - ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा प्रेम, विवाह, सौंदर्य आणि वैवाहिक आनंदाचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषांच्या मते शुक्राचा अस्त होतो तेव्हा हा काळ लग्नासाठी अनुकूल मानला जात नाही. शुक्र अस्ताच्या काळात लग्न केल्यानं वैवाहिक जीवनातील आनंद नष्ट होतो. लग्नानंतर जोडपे कधीही आनंदी राहू शकणार नाही, सतत अडचणी येत राहतात.
advertisement
खरमास - सूर्य हा गुरू, धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. या राशींमध्ये सूर्याची स्थिती अशक्त मानली जाते. खरमास दरम्यानच्या शुभ घटना शुभ मानल्या जात नाहीत. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ऊर्जा, यश आणि आरोग्याचा कारक मानले जाते. सूर्याची शक्ती कमी होते तेव्हा पती-पत्नींना अनेक आघाड्यांवर त्रासाला सामोरं जावं लागतं.
advertisement
चातुर्मास - देवशयनी एकादशीला श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर विश्वाचे नियंत्रण शंकराच्या हातात येतं. श्री हरी विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागृत होतात, तेव्हा विवाह आणि इतर शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. या दोन एकादशींमधील कालावधीला चातुर्मास म्हणतात. या काळात शुभ कार्यक्रम केले जात नाहीत.
विवाह पंचमी - मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी विवाह पंचमी साजरी केली जाते. प्रभु श्रीराम आणि माता सीतेचा विवाह या दिवशी झाल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञ ज्योतिषी या तारखेला लग्न न करण्याचा सल्ला देतात. राम आणि सीतेच्या लग्नानंतर त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच सुरळीत राहिले नाही. त्यांनी 14 वर्षे वनवास सहन केला. रावणाने सीतेचे अपहरण केले. दोघांनाही आयुष्यभर अग्नीद्वारे अनेक संकटे सहन करावी लागली. म्हणूनच ही तारीख लग्नासाठी अशुभ मानली जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Marriage Astro: तो शुभ विवाहच नव्हे! या 4 तारखांना बांधलेल्या लग्नगाठी फार काळ टिकत नाहीत, अशुभ तिथी
Next Article
advertisement
Nagpur News : शहाळ्यातून गांजाची तस्करी, नागपुरातून भाजपचा सरपंच अटकेत, थेट ओडिशा कनेक्शन...
शहाळ्यातून गांजाची तस्करी, नागपुरातून भाजपचा सरपंच अटकेत, थेट ओडिशा कनेक्शन...
  • शहाळ्यातून गांजाची तस्करी, नागपुरातून भाजपचा सरपंच अटकेत, थेट ओडिशा कनेक्शन...

  • शहाळ्यातून गांजाची तस्करी, नागपुरातून भाजपचा सरपंच अटकेत, थेट ओडिशा कनेक्शन...

  • शहाळ्यातून गांजाची तस्करी, नागपुरातून भाजपचा सरपंच अटकेत, थेट ओडिशा कनेक्शन...

View All
advertisement