बालाजी भक्तांना दिलासा! अमरावती-तिरुपती एक्स्प्रेसबाबत महत्त्वाचं अपडेट, ‘या’ तारखेपर्यंत धावणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Amravati-Tirupati Railway: अमरावतीहून तिरुपतीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
अमरावती: तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी बघता अमरावती-तिरुपती एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात आली होती. अमरावती-तिरुपती एक्सप्रेस (क्रमांक 12766/12765) ही गाडी भाविकांसाठी अत्यंत सोयीची ठरली आहे. ही गाडी एका विशिष्ट मुदतीसाठी सुरू करण्यात आली होती. आता या गाडीची मुदत संपली आहे. मात्र, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि नवीन वर्षात होणारी भक्तांची मोठी गर्दी लक्षात घेऊन 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे.
अमरावतीवरून गाडी सुटण्याची वेळ
अमरावतीसह अकोला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांतील प्रवासी मोठ्या प्रमाणात या गाडीतून प्रवास करतात. अमरावती-तिरुपती (गाडी क्रमांक 12766) ही एक्सप्रेस सोमवार व गुरुवारी सकाळी 6.45 वाजता अमरावतीवरून सुटते आणि 8 वाजता अकोल्यात पोहोचते. हीच गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता तिरुपती स्थानकावर दाखल होते.
advertisement
परतीचा प्रवास
परतीच्या प्रवासासाठी तिरुपती-अमरावती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12765) मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुपारी 3.45 वाजता तिरुपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.10 वाजता अमरावतीत पोहोचते.
प्रवाशांच्या मागणीमुळे सेवा पुन्हा अमरावतीहून
काही काळ अमरावती-तिरुपती एक्सप्रेसचा प्रारंभ बिंदू अमरावतीऐवजी अकोला करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे भाविकांसह चाकरमान्यांना मोठी गैरसोय होत होती. सततच्या पाठपुराव्यानंतर मध्य रेल्वेने ही सेवा पुन्हा अमरावती येथून सुरू केली. त्यामुळे सकाळी कार्यालयाला जाणाऱ्या चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना तसेच तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
प्रवाशांची पहिली पसंती बनलेली सेवा
view commentsतिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या बहुतेक भाविकांचा पहिला पर्याय हीच एक्सप्रेस ठरली आहे. दर्शन आटोपल्यानंतर हीच गाडी मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी परतीसाठी उपलब्ध असल्याने भाविकांचा प्रवास सुलभ होतो.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
November 26, 2025 11:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
बालाजी भक्तांना दिलासा! अमरावती-तिरुपती एक्स्प्रेसबाबत महत्त्वाचं अपडेट, ‘या’ तारखेपर्यंत धावणार


