प्रसिद्ध अभिनेत्राच्या सुखी संसारात मीठाचा खडा, लग्नाच्या 10 वर्षांतच मोडला संसार, समोर आलं कारण
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा लग्नाच्या 10 वर्षांत घटस्फोट झाला आहे. अभिनेत्रीने दुसर्या धर्मात लग्न केलं होतं. आता पोस्ट शेअर करत अभिनेत्री घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
advertisement
पूजा बेदी नुकतीच डॉक्टर शीन गुरीब यांच्यासोबत संवाद साधताना दिसली. यावेळी आपलं बालपण, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर तिने भाष्य केलं. पूजा बेदीला येवळी बॉलिवूड सोडण्यामागचं कारण विचारण्यात आलं. याचं उत्तर देत पूजा म्हणाली,"अतिशय कंझर्व्हेटिव्ह मुस्लिम कुटुंबात लग्न केलं होतं आणि त्या कुटुंबाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन स्वतःसाठी आणि नवऱ्यासाठी अडचणी निर्माण करू इच्छित नव्हते".
advertisement
अभिनेत्री पूजा बेदीने लग्नाच्या 10 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. याबद्दल बोलताना म्हणाली,"संसारात मी 100 टक्के दिले होते. माझे पूर्वाश्रमीचे पती फरहान हे खूपच कंझर्व्हेटिव्ह मुस्लिम कुटुंबातील होते आणि त्यांच्या कुटुंबाची सून एखादी ‘सेक्सी अभिनेत्री’ असावी असं त्यांना वाट नव्हतं. पूजा म्हणाली," खूप वाद-विवाद झाले आणि दोन्ही कुटुंबाचा आधीपासूनच आमच्या लग्नाला विरोध होता. मला माझ्या कुटुंबात भांडणं नको होती. त्यामुळे मी बॉलिवूड सोडलं आणि काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला".
advertisement
आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना पूजा बेदी म्हणाली,"मी साधारण 27 वर्षांची होते, तेव्हा मोठी दुःखद घटना घडली. माझ्या आजीचे कॅन्सरने निधन झाले, माझा कुत्रा मरण पावला, आणि ज्यांनी मला 6 महिन्यांची असल्यापासून सांभाळलं, तेही गेले. माझ्या आईचा मृत्यू झाला आणि माझ्या भावाने आत्महत्या केली. या सर्वांच्या दरम्यान माझं लग्नही मोडलं आणि माझी दोन मुलंसुद्धा होती. म्हणजे माझा घटस्फोट झाला आणि शेवटी मला कोणतीही पोटगी मिळाली नाही. मी 32 वर्षांची होते आणि त्यावेळी मी खूप घाबरलेली होते".
advertisement
advertisement
पूजा बेदी पुढे म्हणाली,"एका वर्षातच मी माझ्या नवऱ्यासोबत तीच मर्सिडीज चालवत होते. आमच्यात कोणताही द्वेष नव्हता किंवा राग नव्हता. मी त्याला त्याचा व्यवसाय शून्यातून उभारायला मदत केली. पण त्याबदल्यात मला काही मिळालं नाही. सगळं सहन करावं लागलं. मी थांबू शकत होते किंवा स्वतःसाठी लढू शकत होते, पण मला ते करायचं नव्हतं. पुढे जाण्याची वेळ आली होती आणि मी तसं केलं.”
advertisement


