Mumbai Goa highway accident: धुक्याने केला घात, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, शिवशाही आणि ट्रकची धडक

Last Updated:

Mumbai Goa highway accident: मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ कलमजे परिसरात शिवशाही बस आणि सीएनजी ट्रकची धुक्यात समोरासमोर धडक झाली, ४ ते ५ प्रवासी जखमी, वाहतूक काही काळ विस्कळीत.

News18
News18
मोहन जाधव, प्रतिनिधी रायगड: रायगड जिल्ह्यातून आज एक धक्क्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या एका शिवशाही बसला सीएनजी गॅस भरण्यासाठी निघालेल्या ट्रकने समोरासमोर धडक दिली. माणगाव जवळील कलमजे परिसरात हा अपघात झाला असून, या घटनेमुळे काही काळासाठी महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ४ ते ५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
धुक्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज
महामार्गावर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भीषण अपघाळामागचे मुख्य कारण दाट धुके असल्याची माहिती मिळाली आहे. पहाटेच्या वेळी महामार्गावर पसरलेल्या दाट धुक्यामुळे रस्त्याचा आणि समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेणे चालकांना शक्य झाले नाही. एका क्षणात वेगवान शिवशाही बस आणि सीएनजी ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. धुक्याच्या पडद्याआड झालेला हा अपघात इतका अचानक होता की, दोन्ही वाहनांच्या चालकांना नियंत्रण मिळवण्याची संधीच मिळाली नाही.
advertisement
भीषण धडकेत गाडीचं नुकसान
ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेचा आवाज दूरपर्यंत गेला. धडकेनंतर शिवशाही बसच्या पुढील भागाचे आणि सीएनजी ट्रकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघातात सीएनजी गॅस ट्रक असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. अपघाताच्या तीव्रतेमुळे बसमधील प्रवाशांना जबर धक्का बसला. क्षणार्धात प्रवासाचा आनंद विरून जाऊन सर्वत्र आरडाओरड आणि गोंधळ सुरू झाला.
advertisement
वाहतूक विस्कळीत
या भीषण धडकेत शिवशाही बसमधील साधारण ४ ते ५ प्रवाशांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.
advertisement
पोलिसांकडून तपास
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. धुक्यामुळे अपघात झाला असला तरी, दोन्ही चालकांच्या बाजूने काही निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही वाहनांचे झालेले मोठे नुकसान आणि जखमी प्रवाशांची स्थिती पाहता, महामार्गावरील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Goa highway accident: धुक्याने केला घात, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, शिवशाही आणि ट्रकची धडक
Next Article
advertisement
Raj Thackeray :  'पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण एमएमआर...”
'पोटातली मळमळ ओकतायत”,‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त,“ संपूर्ण MMR...
  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

View All
advertisement