Ashok chavan: मला संपवू नका, नाहीतर...अशोक चव्हाण यांचा विरोधकांना टोला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ashok chavan: माझं नाव घेतल्याशिवाय काहींना करमत नाही. माझं म्हणणं आहे की मी उद्या नसेल राजकीय क्षेत्रामध्ये, रोज 24 तास माझ्यावर टीका केली जाते, इतकं मी कोणाचं वाईट केलं का? तेव्हा कोणावर बोलणार तुम्ही प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.
नांदेड, प्रतिनिधी मुजीब शेख: विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी नेत्यांच्या सभा सुरू आहेत. विधानसभेसाठी आशोक चव्हाण यांनीही कंबर कसली आहे. काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिल्यानंतर नांदेडमध्ये जास्त जागा निवडणूक आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर भाजपकडून सोपवण्यात आली आहे.
भाजप नेते अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान विरोधकांना टोला लगावत आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. ''मला संपवू नका, मी संपलो तर तुम्ही कसं राहाल असं सूचक विधान करत अशोक चव्हाणांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. नांदेडमधील भोकर मतदारसंघातील आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या टीकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.''
advertisement
''विकासात्मक काम करण्यासाठी अशोक चव्हाण तुमच्या सोबत आहे हे जाहीरपणे सांगतो असंही ते म्हणालेत, दरम्यान, माझं नाव घेतल्याशिवाय काहींना करमत नाही. माझं म्हणणं आहे की मी उद्या राजकीय क्षेत्रात नसलो तर त्यावेळी तुम्ही कुणावर बोलणार,म्हणून मला जिवंत ठेवा, मी जीवंत राहिलो तर तुम्ही जिवंत राहाला असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.''
advertisement
''माझं नाव घेतल्याशिवाय काहींना करमत नाही. माझं म्हणणं आहे की मी उद्या नसेल राजकीय क्षेत्रामध्ये, रोज 24 तास माझ्यावर टीका केली जाते, इतकं मी कोणाचं वाईट केलं का? तेव्हा कोणावर बोलणार तुम्ही प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.''
कधी होणार विधानसभा निवडणूक?
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असून लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आय़ोग तारखा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे. ही पत्रकार परिषद 13 किंवा 14 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग मतदान आणि निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्याच्या निवडणुकीबाबत अद्याप निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 04, 2024 10:32 AM IST








