एक रहेंगे तो सेफ रहेंगे, महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत PM मोदींचा नारा, म्हणाले, मविआच्या गाडीला...

Last Updated:

PM Narendra Modi : धुळ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करताना महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला.

News18
News18
धुळे : महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात सभा झाली. धुळ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करताना महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केला. धुळ्याची ही धरती आणि महाराष्ट्राशी माझं नातं सर्वजण ओळखता. महाराष्ट्राकडे जेव्हा जेव्हा मी काही मागितलंय तेव्हा मोठ्या मनाने मला ते दिलंय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, २०१४ मध्ये मी धुळ्यात आलो होतो. मी तुम्हाला महाराष्ट्रात भाजप सरकारसाठी आग्रह केला होता. तुम्ही महाराष्ट्रात १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपला मोठा विजय मिळवून दिलात. पुन्हा एकदा मी धुळ्यात आलो आहे. इथूनच महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहे. तुमचं हे प्रेम, इतक्या मोठ्या संख्येनं सभेसाठी तुम्ही आला आहात. हे उत्साह वाढवणारा आहे.
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली ती थांबू देणार नाही. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीला वेगळ्या उंचीवर नेलं जाईल. महाराष्ट्राला हवं असलेलं सुशासन फक्त महायुतीचं सरकार देऊ शकते. महाआघाडीच्या गाडीला ना चाकं आहेत, ना ब्रेक आहे. ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी  त्यांच्यात भांडण सुरू असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
advertisement
मविआने सरकार आणि जनतेला लुटलं
राजकारणात येताच प्रत्येकाचं ध्येय असतं. आम्ही जनतेला देव मानतो. जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो. पण काही लोकांच्या राजकारणात येण्याचा उद्देश लोकांना लुटणं आहे. लोकांना लुटणारे मविआसारखे लोक सरकारमध्ये येतात तेव्हा विकास रोखतात. प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. तुम्ही महाविकास आघाडीच्या धोक्यानं बनलेल्या सरकारला पाहिलंय. या लोकांनी सरकार आणि नंतर जनतेला लुटलं असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
advertisement
मविआची योजनांना आडकाठी, महायुती येताच स्थिती बदलली
मविआने विकासकामांना रोखण्याचं काम केलं असंही मोदी म्हणाले. त्यांनी म्हटलं की, या लोकांनी मेट्रो योजना अडकवल्या. वाढवण बंदरात आडकाठी आणली. समृद्धी महामार्गाला ब्रेक लावला. महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल बनवणाऱ्या योजनांना त्यांना आडकाठी आणली. राज्यात महायुतीचं सरकार येताच ही स्थिती बदलली. लाडकी बहीणची चर्चा देशभरात आहे. पण काँग्रेसकडून ही योजना बंद करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. योजनेविरोधात ते कोर्टात पोहोचले आहेत. सत्ता मिळाली तर ते सर्वात आधी ही योजना बंद करतील.
advertisement
एक रहेंगे तो सेफ रहेंगे
काँग्रेसने धर्माच्या नावावर षडयंत्र रचलं तेव्हा देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस एससी, एसटी ओबीसीमध्ये जातींना एकमेकांविरोधात उभा करत आहे. भारतात यापेक्षा मोठं षडयंत्र असू शकत नाही. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागल्याने तुमची ताकद कमी होईल. एक असाल तर सुरक्षित रहाल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक रहेंगे तो सेफ रहेंगे, महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत PM मोदींचा नारा, म्हणाले, मविआच्या गाडीला...
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement