"तुझी औकात नाही साल्या..", पैशांची ऑफर घेताच तरुणाने लक्ष्मण हाकेंची काढली लाज, AUDIO क्लिप व्हायरल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
एका तरुणाने फोन करून कथितपणे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर देऊन त्यांची लाज काढली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण कथितपणे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर देताना ऐकू येत आहे. लक्ष्मण हाकेंनी ऑफर स्विकारून पैसे घेण्यासाठी यूपीआय नंबर दिला असता, फोनवरील तरुणाने हाके यांची लाज काढली आहे. पैसे घेऊन, सुपाऱ्या घेऊन तुम्ही समाजाला भडकवता, असा आरोपही तरुणाने केल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.
कथित ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पाठबळ देण्यासाठी पैशांची ऑफर दिली. पेट्रोल साठी आपण तुम्हाला पैसे देऊ इच्छित आहे. तुम्हाला पैसे कसे देऊ, कॅशमध्ये द्यायचे की फोन पे, गूगल पे वर देता येईल? असं तरुणाने विचारलं. यावर हाके यांनी तुम्ही भेटायला या, असं सांगितलं. पण तरुणाने फोनवरच ऑफर दिली. यानंतर हाके यांनी ऑफर स्विकारली. आणि आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला.
advertisement
तसेच आपण आपल्या खात्यावर पैसे घेत नसल्याचं देखील व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं. यूपीआय नंबर दिल्यानंतर मात्र तरुणाने हाके यांचू चांगलीच कानउघडणी केली. त्यांची लाज काढली. हाके यांच्या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिपची पुष्टी न्यूज १८ लोकमत करत नाही.
ऑडिओ क्लिपमध्ये तरुण काय म्हणाला?
हाकेंना उद्देशून संबंधित तरुण म्हणाला, "तुम्ही एवढं समाजासाठी काम कराताय. भुजबळसाहेबही तुम्हाला सहकार्य करतात. तुम्ही मस्तपैकी लोकांकडून पैसे घेताय. सुपाऱ्या घेऊन दुसऱ्यांना बोलता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही ओ लक्ष्मण सर... जनाची ना मनाची लाज ठेवा. समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय. जरांगेंना एवढं बोलताय. सुपाऱ्या घेताय. जनाची ना मनाची तुम्हाला लाज कशी वाटत नाही. शहाजीबापूच्या विरोधात उभा राहिला अन् २०० मतं पडली. तुझी औकात नाही साल्या अन् तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटू दे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 9:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"तुझी औकात नाही साल्या..", पैशांची ऑफर घेताच तरुणाने लक्ष्मण हाकेंची काढली लाज, AUDIO क्लिप व्हायरल